योगा (Yoga) शारीरिक आणि वैद्यकीय फायद्यांसोबतच आत्मा आणि आध्यात्मिक चेतना जागृत करण्याचे काम करतो. तसेच योगा हा माणसांची चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी मोठी भूमिका बजावतो. योग हा शब्द संस्कृतच्या ‘युज’ या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ सामील होणे किंवा जागृत होणे असा आहे. योगाचे शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे हजारो वर्षांपासून योग अभ्यासकांनी सांगितले आहेत. (When to do yoga Which seats to do)
अनेकवेळा योगाभ्यास नेमका केव्हा करावा हे लोकांना कळत नाही. काही लोक सकाळी योगासने करण्याचा सल्ला देतात तर काही सायंकाळी करण्यास सांगतात. यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम (Confusion) निर्माण होतो. योग अभ्यासक वसंत कुंज सांगतात की, योगा केव्हाही करता येतो. फक्त योगा करण्यात सातत्य असायला हवे. शरीर, आजूबाजूचे वातावरण, बदलते ऋतू, वेळेची उपलब्धता आणि दैनंदिन जीवनशैली यानुसार तुम्ही योगा (Yoga) करण्यासाठी योग्य वेळ निवडू शकता.
सकाळी योगा करण्याचे फायदे
सकाळी योगासने केल्याने ‘एंडॉर्फिन’ सक्रिय होण्यास मदत होते.
यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीराला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळते.
सकाळी योगासने केल्याने दिवसभरात काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता.
शरीराला झेपवेल इतकाच योगा करा. थकवा येईपर्यंत योगा करणे टाळा.
सकाळी कोणते आसन करावे?
सकाळच्या योगामध्ये सूक्ष्म व्यायामाचा समावेश असावा.
सूर्यनमस्कार, पुढे वाकणे, उलटे वाकणे, मागे वाकणे यासारखे योगासने आणि प्राणायाम करा.
योगाचा शेवट पाच मिनिटे ध्यान करून करा.
सायंकाळी योगा करीत असाल तर हे लक्षात घ्या
सायंकाळी योगा केला तर दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच ताजेतवाने आणि शांत वाटते.
सायंकाळी इतका योग करू नये की शरीर अतिउत्तेजित होईल आणि रात्री झोपताना हाडं दुखतील.
शक्य होईल तितकाच योगा किंवा प्राणायाम करा.
सायंकाळी कोणते आसन करावे?
सायंकाळच्या योगामध्ये शरीर वळवणे, पुढे आणि मागे वाकणे आणि उलटे होणे यासारख्या आरामदायी मुद्रांचा समावेश करा.
पाठीचा कणा वाकवणे टाळा आणि वेगाने श्वास घेणे टाळा.
असे केले तर शरीर जास्त प्रमाणात उत्तेजित होऊ शकते. यामुळे झोपेत त्रास होऊ शकतो.
शरीराला आराम देण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी आरामदायी प्राणायाम आणि पाच मिनिटे ध्यान करून योग संपवा.
योगा केल्याने होतात हे फायदे
जेवणाआधी दोन तास किंवा जेवणानंतर किमान दोन तासांनी योगासने करा.
योग करण्याची योग्य वेळ ठरवून ती नियमित केल्यानेच फायदा होईल हे लक्षात घ्या.
योगा करताना सातत्य ठेवले की आरोग्यामध्ये आपोआप सकारात्मक बदल घडवून येतील.
तुम्ही जितका जास्त सराव कराल तितके तुम्ही तुमच्या मनाशी आणि शरीराशी जोडून राहाल.
तुमचे मन समाधानी आणि शरीर तंदुरुस्त राहिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.