Health Care News : कंबरेच्या दोन्ही बाजूला चरबी वाढलीये? मग ‘या’ व्यायामांमुळे वाढलेली चरबी होईल वेगाने कमी

आपण कंबरेभोवती जमा झालेल्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या व्यायामाबाबत जाणून घेणार आहोत.
healtjh care
healtjh caresakal
Updated on

सध्याची बदलती जीवनशैली, फास्टफूड खाणे, एका जागी बसून जास्तवेळ काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यात बहुतेक लोक व्यायाम करायचाही कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा निर्माण होतो. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

लठ्ठपणा हा सगळ्यात आधी कंबरेपासून सुरू होतो. आपल्या शरीरात कंबर आणि पोटाभोवती चरबी जमा होत असते. त्यामुळे लोक पोट कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. तर आता आपण कंबरेभोवती जमा झालेल्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या व्यायामाबाबत जाणून घेणार आहोत.

healtjh care
Monsoon Health Care : पावसाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी! जीवनशैलीत करा हे बदल...

1. प्रथम कार्डिओने सुरुवात करा

कार्डिओच्या मदतीने हृदयाचे ठोके जलद होतात आणि शरीरातील चरबी लवकर जळते. जंपिंग जॅकने सुरुवात होईल.

जंपिंग जॅक कसे करावे

जंपिंग जॅक्स करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर उडी मारत दोन्ही पायातले अंतर वाढवा आणि त्याचवेळी दोन्ही हात डोक्यावर नेऊन टाळी वाजवा.

दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा उडी मारत दोन्ही पाय जवळ आणा आणि दोन्ही हात खाली घ्या.

जलद पद्धतीने उड्या मारत 10 ते 15 वेळा हा व्यायाम करावा.

2. जंप स्क्वॅट्स

जंप स्क्वॅट्स कसे करावे

1. सर्व प्रथम, गुडघे आणि कोपर किंचित वाकवून उडी मारण्याच्या स्थितीत उभे रहा.

2. पाय एकमेकांपासून फार दूर नसावेत हे लक्षात ठेवा.

3. आता उडी मारून त्याच स्थितीत परत या.

3. प्लँक

प्लँक हा व्यायाम केल्यामुळे कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम केल्यामुळे शरीरातील चरबी कमी तर होतेच सोबत तुमच्या शरीरातील सर्व भाग मजबूत होतात.

4. फॉरवर्ड लंजेस

हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. दोन्ही हात कंबरेवर ठेवा. आता एक पाय साधारण एखादा फुट पुढे घ्या. आता हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा.

जोपर्यंत मागच्या पायाचा गुडघा जमिनीला टेकत नाही तोपर्यंत खाली वाका. यानंतर या अवस्थेत 5 ते 10 सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.

एकूण 10 ते 12 वेळा ही क्रिया पुन्हा पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या पायाने पुन्हा अशाच पद्धतीने व्यायाम करावा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com