पाठदुखीचा त्रास सतत छळतोय! करा घरगुती उपाय

पाठीच्या दुखण्यावर दुर्लक्ष केल्यानं दुखणं वाढतं. म्हणूनच यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहे.
Back pain
Back painsakal
Updated on

धावपळीची या जीवनात माणसाचे स्वत:कडे दुर्लक्ष होत आहे. दिवसभराच्या धावपळीत माणसाला ना आराम करायला वेळ आहे ना व्यायामाला. अशा दिनचर्येत माणसाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यात पाठदुखीचा त्रास अनेकांना भेडसावतो. पाठीच्या दुखण्यावर दुर्लक्ष केल्यानं दुखणं वाढतं. म्हणूनच यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहे.

Back pain
Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात सामावेश

पाठदुखीची कारणं

आपली रोजची जीवनशैली पाठदुखीसाठी कारणीभूत आहे, कारण अनेकांना कामानिमित्त ऑफिसमध्ये दिवसरात्र कम्प्युटर समोर बसून काम करावं लागतं, बस किंवा ट्रेननं प्रवास करताना तासन् तास उभं राहून प्रवास होतो. हा प्रवास करताना पाठीवर असलेल्या बॅगेमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. बऱ्याचदा आपण चुकीचं झोपतो, ताठ बसत नाही, बरीचशी कामं बसूनच करतो. परिणामी, बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःच आपल्या या पाठीच्या दुखण्याला आमंत्रण देतो.

Back pain
उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतोय, हे पाच उपाय नक्की करा

पाठदुखीवर काही सोपे घरगुती उपायही करता येईल. त्यातील काही सोपे उपाय खालील प्रमाणे-

1. बर्फामुळे वेदना शमतात. बर्फ रुमालात गुंडाळून पाठीवर ज्या ठिकाणी वेदना होतात तिथे 5-10 मिनिटं फिरवावा. यामुळे पाठीच्या वेदना कमी होतात.

2. बसण्या उठण्याच्या , चालण्याच्या, उभे राहाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराची ठेवण सदोष होते. वाकून, खांदे झुकवून चालणं, वाकडं उभं राहाणं, पाठीला वाक देऊन बसणं यामुळे पाठीचं दुखणं उद्भवतं. तज्ज्ञ म्हणतात बसताना ताठ बसावं, पाठीला आराम हवा असल्यास पाठ टेकून पण ताठ बसावं. झोपतानाही पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करावा.

3. लसणाचं तेल लावल्यास पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो. लसणाचं तेल करण्यासाठी भांड्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यावं. मंद आचेवर तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात 8 ते 10 लसणाच्या कळ्या घालाव्यात. लसूण सोनेरी रंगावर तळला गेला की गॅस बंद करावा. तेल गाळून घ्यावं. या तेलानं पाठीचा मसाज कराव

Back pain
पुष्पा चित्रपटाच्या गाण्यावर वधूच्या वडीलांचा झकास डान्स पाहिला का? पहा Video

4. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात इप्सम साॅल्ट टाकावं. हे मीठ पाण्यात् लगेच विरघळतं. या पाण्यानं आंघोळ केल्यास पाठीला दीर्घ काळ आराम मिळतो.

5. पाठीच्या स्नायुंवरचा ताण घालवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक असतं. पाठीचे स्नायुंवर आलेला ताण घालवण्यासाठी पाठ आणि पोटाचे व्यायाम नियमित करायला हवेत असं तज्ज्ञ सांगतात.

6. दूधात हळद आणि मध घालून पिल्यास पाठीचं दुखणं कमी होतं. या उपायानं केवळ पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो

7 . पाठीचं दुखणं नेहमीचंच असं म्हणून दुर्लक्ष न करता ते घालवण्यासाठी पाठीला नियमित मसाज करायला हवा. रोज हळूवार मसाज केल्यास पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो.

8. पाठदुखीवर जसे बाह्य उपचार महत्वाचे असतात तसेच पोटातूनही उपचार करता येतात. यासाठी दूधात हळद आणि मध घालून पिल्यास पाठीचं दुखणं कमी होतं. या उपायानं केवळ पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो असं नाही तर शरीरात इतर ठिकाणच्या वेदनांवरही आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.