Childhood Asthma : बदलत्या वातावरणामुळे बाल दमा वाढण्याचा धोका

Childhood Asthma : मुलांचे आरोग्य जपा : वातावरण बदलाचा मुलांच्या आरोग्यावर होतोय विपरित परिणाम
Childhood Asthma
Childhood Asthmaesakal
Updated on

Childhood Asthma : सध्याचे वातावरण बघता उन्हाळा आहे, की पावसाळा हेच कळायला मार्ग नाही. ऐन उन्हाळ्यात अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्याने वातावरण बदलले. अशा हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो.

मुलांना अशा वातावरणात बाल दमा, श्वसनाच्या आजारासह त्वचेचे विकार होण्याची जोखीम असते. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे ठरते. अचानक पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. डेंगीसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

अकाली वातावरण बदलाचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पाऊस, थंडी, ऊन्हाच्या वातावरणात काही विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे आक्रमण मुलांवर लवकर होते.

त्यामुळे मुलांचे आरोग्य जपण्यासाठी सुरक्षात्मक उपायोजनांवर पालकांनी भर द्यावा. आपल्या घरातील वातावरण उबदार असावे. परिसर स्वच्छ ठेवावा, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिला.

Childhood Asthma
Summer Hydrating Drinks : उन्हाळ्याची लागली चाहुल, ताक, लस्सीचे फायदे घ्या जाणून

हे लक्षात ठेवा

  • घरातील ओला व सुका कचरा वेगळा ठेवा.

  • भांडी, कपडे ओलसर ठेवू नका.

  • स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ ठेवा.

  • लहान मुलांची खेळणी ओलसर झाली की, एकदा निर्जुंतक पाण्यातून विसळून घ्यावीत.

  • जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

  • उघड्यावरील अन्नपदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.

  • तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती नाजूक असते. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला हे सिझनल आजार होण्याची शक्‍यता असतेच. परंतु या वातावरण विषाणू हवेव्दारे पसरतात. तसेच बाल दमा, डेंगी वाढण्याची मोठी जोखीम आहे.

त्वचाविकार होण्याचा धोका आहे. दिवसांत सोडा, कोल्ड ड्रिंक्स, कॅंडीज, चॉकलेट, रिफाइंड व प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून मुलांना दूर ठेवा. ताजे व हलका आहार घेण्यावर भर द्यावा.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

बदलत्या वातावरणात ‘या’ आजारांचा धोका

  • मुलांमध्ये बाल दमा वाढण्याची जोखीम

  • ताप येणे

  • डोकेदुखी

  • अंगदुखी

  • मुलांमध्ये पोटदुखीचा त्रास

  • त्वचेचे आजार होण्याची भीती

  • व्हायरल डायरियाचा धोका

उपाययोजना

  • लहान मुलांच्या आहारात सुकामेवा असावा.

  • दररोज फळ, दूध आदींचा समावेश करावा.

  • शरीर गरम ठेवण्यासाठी मुलांची तेलाने मालिश करावी.

  • मुलांना कोवळ्या उन्हात ठेवावे. कोमट पाण्याने अंघोळ घालावी.

  • मुलांना उकळून गार केलेले पाणी पिण्यास द्यावे.

  • मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजावे

Childhood Asthma
Summer Health Tips : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम; उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.