येत्या काही दिवसांत चांगले विषाणू रोगजनक जीवाणूंना नष्ट करणारे शस्त्र ठरू शकतात.
मानवी शरीरात (Human Body) अनेक प्रकारचे रोग (Diseases) विषाणूंद्वारे (Virus) पसरतात, परंतु एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, येत्या काही दिवसांत चांगले विषाणू रोगजनक जीवाणूंना (Pathogenic Bacteria) नष्ट करणारे शस्त्र ठरू शकतात. याबाबत इंग्लंडमधील (England) एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या (University of Exeter) शास्त्रज्ञांनी (Scientists) केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष सेल होस्ट (Cell Host) आणि मायक्रोब (Microbes) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. बॅक्टेरियांमुळे (Bacteria) न्यूमोनिया (Pneumonia), क्षयरोग (Tuberculosis), गोनोरिया (Gonorrhea) यांसारख्या संसर्गजन्य रोगांच्या (Infectious Diseases) वाढत्या प्रकरणांमुळे प्रतिजैविक (Antibiotics) प्रतिरोधक क्षमता देखील वाढत आहे आणि या रोगांवर उपचार करणे कठीण होत आहे. त्यामुळे उपचारही महाग होत आहेत. मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी फॅग थेरपीची (Fag Therapy) संकल्पना नव्याने पुढे आली आहे. यामध्ये मानवासाठी हानिकारक नसलेले व्हायरस वापरले जातात, जे बॅक्टेरियामध्ये वेगाने वाढू शकतात. (A new toolkit will be available to fight infection)
असे मानले जाते की, प्रतिजैविकांसह फॅग थेरपी हा संसर्गावर प्रभावी उपचार असू शकतो. यामुळे जीवाणू प्रतिजैविक प्रतिरोधक बनण्याची शक्यता कमी होईल. तथापि, अशी शक्यता आहे की जीवाणू देखील फॅगला प्रतिकार करू शकतात.
हा नवीन अभ्यास काय सांगतो?
एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या या नवीन अभ्यासात प्रतिजैविक आणि फॅग थेरपीच्या वापराने उपचार किती प्रभावी ठरू शकतात हे सांगण्यात आले आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत स्यूडोमोनास एरुगिनोसा नावाच्या बॅक्टेरियावर संशोधन केले. या जीवाणूमुळे सिस्टिक फायब्रोसिस (Cystic Fibrosis) (फुफ्फुस आणि पचनसंस्थेचे आजार) होतात. या जीवाणूचा प्रतिकार कसा विकसित होतो आणि ते फॅगच्या प्रकरणांपेक्षा वेगळे कसे आहे हे तपासण्यासाठी आठ प्रकारच्या प्रतिजैविकांचा वापर करण्यात आला.
जीवाणूंना संक्रमित करण्यासाठी, व्हायरस त्याच्या पेशींच्या पृष्ठभागावर प्रवेश करतो. मानवी रोगप्रतिकारक प्रणालीप्रमाणे जीवाणूंची स्वतःची संरक्षण यंत्रणा CRISPR नावाची प्रथिने बनलेली असते, जी संसर्गाशी लढते. तरीही व्हायरस जीवाणूंना संक्रमित करतो आणि मारतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
एक्सेटर विद्यापीठातील एन्व्हायर्नमेंट अँड सस्टेनेबिलिटी इन्स्टिट्यूटचे (Environment and Sustainability Institute) प्राध्यापक एडझे वेस्ट्रा (Edge Vestra) यांच्या मते, प्रतिजैविक प्रतिरोध ही सार्वजनिक आरोग्याची एक मोठी समस्या आहे आणि तिच्या निराकरणाकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. फॅग थेरपी या दिशेने एक महत्त्वाचे टूलकिट सिद्ध होऊ शकते. यामुळे, प्रतिजैविकांचा वापर कमी करणे आणि एकत्रितपणे उपचार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
ते पुढे म्हणाले, आम्हाला आढळून आले आहे की, फॅगसह वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिकचा प्रकार बदलल्याने बॅक्टेरियाच्या प्रतिकारशक्तीमध्ये त्यांच्या स्वतःनुसार बदल होऊ शकतो. यामुळे उपचारांचा प्रभाव वाढेल. फेज-अँटीबायोटिक संयोजनासह या थेरपीची प्रभाविता विचारात घेतली पाहिजे.
फॅग थेरपी प्रथम 1919 मध्ये वापरली गेली
फॅग थेरपीचा वापर पहिल्यांदा पर्शियन मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) फेलिक्स डी-हेरेले (Felix de Herrele) यांनी 1919 मध्ये केला होता, ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलाला आमांशावर उपचार करण्यासाठी फॅग कॉकटेल देण्यात आले होते. नंतर या दिशेने अभ्यास जवळजवळ थांबला. प्रतिजैविकांचा वापर वाढू लागला. आता पुन्हा फॅगवरील अभ्यासाला वेग आला आहे. यामुळे प्रतिजैविकांच्या प्रतिकाराची समस्या दूर होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.