हिवाळा हा आरोग्याचा सर्वोत्तम काळ असतो, ज्यामध्ये अभ्यंग तेल मालिशाने शरीराची देखभाल करा. हा उपाय शारीरिक ताजेपणासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती साठी उपयुक्त आहे.
हिवाळ्याचे आगमन सर्वांनाच हवेहवेसे वाटते. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही हिवाळा हा सर्वांत आरोग्यदायी ऋतू तर असतोच पण तो आरोग्य कमावण्यासाठी सुद्धा सर्वश्रेष्ठ काळ असतो. आणि यासाठी अभ्यंग हा एक रामबाण उपाय असतो.