Obesity : दहा वर्षांत प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला ‘लठ्ठपणा’चा विळखा

Obesity : जागतिक स्तरावर झालेल्या अभ्यासातून २०३५ पर्यंत ५१ टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार असतील
Obesity
Obesityesakal
Updated on

Obesity : घाम आणणारा किंवा व्हायब्रेट होणारा बेल्ट लावा, चरबी कमी करा विशिष्ट पावडर खाऊन, औषधी चहा पिऊन स्लिम व्हा, हे जेल लावून वजन घटवा, असे आकर्षक दावे बघत असताना ‘स्विगी’, ‘झोमॅटो’तून मागवलेल्या जंक फुडवर ताव मारला जातो. असे चित्र घराघरात दिसते.

सन २०३५ पर्यंत दर दुसरी व्यक्ती ‘लठ्ठपणा’च्या विळख्यात सापडणार असल्याची जोखीम जागतिक स्तरावरील सर्वेक्षणातून पुढे आली आहे, अशी माहिती प्रसिद्ध बॅरिएट्रिक सर्जन डॉ.संजय बोरुडे यांनी शनिवारी येथे दिली.

येत्या दशकात लठ्ठपणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल. या पार्श्‍वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात लठ्ठपणा विषयावर डॉक्टरांसाठी परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेसाठी डॉ. संजय बोरुडे नागपुरात आले असता त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

जागतिक स्तरावर झालेल्या अभ्यासातून २०३५ पर्यंत ५१ टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार असतील असे सांगत ८७ टक्के डॉक्टरांना बालपणातील लठ्ठपणावर उपचारांविषयी माहिती नसल्याचा गौप्यस्फोट डॉ. संजय बोरुडे यांनी केला. ७० टक्के किशोरवयीन मुले तर ५० टक्के मुले पौगंडावस्थेतील मुले प्रौढावस्थेत लठ्ठ होतात. बालपणातील लठ्ठपणाची कारणे वेगळी असतात. जन्मल्यापासून मुलांमध्ये स्थूलपणा येऊ शकतो. आनुवंशिकता हे सुद्धा कारण आहे. आई आणि वडील लठ्ठ असले तर बाळही लठ्ठ होण्याची शक्यता वाढते.

Obesity
Health Care : आहारात मीठाचा वापर कमी करा, अन्यथा उच्च रक्तदाब अन् किडनीच्या आजारांचा वाढेल धोका

सकाळी पाचचा अलार्म लावून बागेत तासभर फिरून येण्याचे ‘प्लॅन’ आखतात, तेही फसतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधोपचाराचा भडिमार शरीरावर करतात, मात्र लठ्ठपणा, अतिलठ्ठपणा कमी होत नाही. अशावेळी लठ्ठपणावरील सर्जरी शेवटचा पर्याय न ठेवता, सहा वर्षे प्रतीक्षा न करता सहा महिन्यात ‘बॅरिएट्रिक सर्जरी’ करून घेतल्यास विविध आजारांना दूर ठेवण्यास निश्चितच मदत होते. ५ वर्षे वयापर्यंतच्या लठ्ठ मुलांवर बॅरिएट्रिक सर्जरी ९२ टक्के यशस्वी आहे.

- डॉ.संजय बोरुडे, बॅरिएट्रिक सर्जन, मुंबई.

११ महिन्यांच्या बाळाच्या लठ्ठपणावर शस्त्रक्रिया

गुटगुटीत बाळ म्हणजे हेल्दी बाळ हा समज चुकीचा आहे. ११ महिन्यांच्या बाळाचे वजन १९ किलो होते. त्या पालकांचे पहिले बाळ असेच लठ्ठ होते, ते दगावले. यामुळे या दुसऱ्या बाळामध्येही तीच लक्षणे दिसली. डॉक्टरांकडे बाळाला नेले, पुढे पेडियाट्रिक इंडोक्रायनोलॉजिस्ट यांनी डॉ. बोरुडे यांच्याकडे रेफर केले.

डॉ. बोरुडे यांनी विविध चाचण्या केल्यानंतर या बाळावर बॅरिएट्रिक सर्जरी केली. आज ते बाळ १३ वर्षांचे आहे. दुसऱ्या २० महिन्यांच्या बाळावरही लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्जरी केली. एका १९ वर्षांच्या मुलाचे वजन १९६ होते, त्याच्यावरही सर्जरी केली. आता त्याचे वजन ८०आहे. मागील २५ वर्षांत डॉ. बोरुडे यांनी लठ्ठपणावर सुमारे ७ हजार बॅरिएट्रिक सर्जरी केल्या असून यातील सर्वात लठ्ठ असलेल्या व्यक्तीचे वजन २७३ किलो होते.

स्थुलतेमुळे उद्भवणारे आजार

  • मधुमेह

  • उच्च रक्तदाबासह

  • पित्ताशयाच्या पिशवीत खडे होणे

  • मूत्रपिंडाचे विकार

  • गुडघेदुखी

  • पाठदुखी

  • सांधेदुखी

  • पक्षाघाताचा धोका

  • झोपेचे आजार

  • कॅन्सर

  • वंध्यत्व

Obesity
Health Care : ॲलर्जीपासून दूर राहायचंय? मग, आवडीच्या पदार्थांना करा बाय बाय..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.