‘मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं’

माझ्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यसुद्धा आहे. माझा व्यायामाचा दिनक्रम सकाळी ६ वाजता सुरू होतो.
actress charul malik
actress charul maliksakal
Updated on

- चारुल मलिक, अभिनेत्री

माझ्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यसुद्धा आहे. माझा व्यायामाचा दिनक्रम सकाळी ६ वाजता सुरू होतो. उठल्याबरोबर मी थोडं स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करते. त्यानंतर ३० मिनिटं कार्डिओ करते, ज्यात धावणं, सायकल चालवणं किंवा जंपिंग जॅक्स असतात. कार्डिओनंतर ३० मिनिटं वेट ट्रेनिंग करते, ज्यामुळे माझं शरीर मजबूत आणि टोन्ड राहतं.

वर्कआउटमध्ये विविध प्रकारचे व्यायाम असतात. मी जिममध्ये वर्कआउट करते, ज्यात स्क्वॅट्स, लंग्ज, प्लॅन्क्स आणि डेडलिफ्ट्स सारखे व्यायाम समाविष्ट असतात. हे व्यायाम शरीराच्या विविध भागांना मजबूत करतात. मला झुंबा डान्स खूप आवडतो, त्यामुळे मी कधी-कधी झुंबा क्लासेससुद्धा अटेंड करते. झुंबा केल्यानं व्यायाम आणि मजा दोन्ही मिळतात.

मी सध्या ‘ॲण्ड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेमध्ये रूसाची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणामुळे दिवसभर खूप धावपळ होते. त्यामुळे आरोग्य सांभाळणं खूर गरजेचं असतं. त्यामुळे माझ्या फिटनेस दिनक्रमात योग आणि मानसिक स्वास्थ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. प्राणायाम आणि ध्यान केल्यानं मन शांत राहतं आणि शरीर लवचिक होतं. तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. योगामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, जी मला दिवसभर उत्साही ठेवते.

माझ्या आहाराबद्दल सांगायचं झालं, तर तो संतुलित आणि पौष्टिक असतो. मी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रोटिनयुक्त आहारावर भर देते. जंक फूड टाळून मी घरचं शिजवलेलं जेवण जास्त प्रमाणात खाते. पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी दररोज १० ग्लास पाणी पिते.

शारीरिक फिटनेससोबत मानसिक स्वास्थ्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तणाव दूर ठेवण्यासाठी मी वाचन करते, संगीत ऐकते आणि कुटुंबासोबत वेळ घालवते. या सगळ्या गोष्टींमुळे मला ताजंतवानं वाटतं आणि कामात उत्साह येतो. फिट आणि निरोगी राहणं ही माझी जीवनशैली आहे, आणि मी तिचं पालन करते. तुम्हीसुद्धा तुमचं आरोग्य सांभाळा.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स...

  • दररोज किमान अर्धा तास तरी आपल्या आरोग्यासाठी द्या.

  • शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्या.

  • जंक फूड टाळून फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रोटिनयुक्त आहारावर भर द्या.

  • दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या.

  • नेहमी आनंदी राहा आणि आपले छंद जोपासा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com