Eye Care : हे 10 पदार्थ आय लेंस स्वच्छ करतात, अगदी उतरत्या वयातही सगळं दिसेल नीट अँड क्लियर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी वेळीच काही पदार्थ खाणे गरजेचे आहे
Eye Care
Eye Care esakal
Updated on

Eye Care : डोळ्यांची दृष्टी कमी झाली की जग धुसर दिसायला लागतं. वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमी होत जाते. तेव्हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी वेळीच काही पदार्थ खाणे गरजेचे आहे. एकवेळी वयानुसार दृष्टी कमजोर झाल्यास आपण समजू शकतो मात्र तारुण्यातसुद्धा अनेक लोकांना नीट दिसत नाही. हे मात्र वाढत्या वयासह त्यांच्यासाठी आणखीच गंभीर ठरू शकतं. तेव्हा आजच तुमच्या डाएट फूडमध्ये या १० पदार्थांचा समावेश करा. जाणून घेऊया डायटिशीयन मनप्रीत कडून.

संत्री आणि बदाम

डायटीशियन मनप्रीत यांनी सांगितले की बदाम डोळ्यांसाठी खूप चांगले असते. 5 भिजवलेले बदाम रोज सकाळी रिकाम्या पोटी खावेत. यामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि डोळ्यांची दृष्टी वाढते. त्याच वेळी, दिवसातून 1 संत्री खाल्ल्याने व्हिटॅमिन सी देखील मिळते, ज्यामुळे डोळ्यांजवळील रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

eye care
eye care

गाजर आणि रताळे

रोज संध्याकाळी रताळ्याची चाट बनवा आणि खा, त्यात बीटा कॅरोटीन असते जे कोरडे डोळे आणि अंधत्वाशी लढण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खाणे आवश्यक आहे. यात ल्युटीन आणि बीटा कॅरोटीन असते, जे डोळ्यांना निरोगी ठेवते. तुम्ही संध्याकाळी गाजराचा रसही पिऊ शकता. (Eye Care)

Eye Care
Eye Care Tips : डोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका; वेळीच उपाय करा नाहीतर...

सूर्यफुलाच्या बिया आणि मेथीदाणे

1 चमचे सूर्यफुलाच्या बिया सॅलेड, फळ किंवा स्मूदीमध्ये खा. यामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे म्हातारपणातही तुमच्या डोळ्याच्या दृष्टीला जपते. तसेच रोज सकाळी मेथीचे पाणी खावे किंवा पाण्यात भिजवून खाऊ शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांची लेन्स खराब होत नाही.

पालक आणि बीट

पालक आहारात समाविष्ट केल्याने झेक्सॅन्थिन मिळते, जे वाढत्या वयात दृष्टी कमी होण्यास प्रतिबंध करते. याशिवाय नाश्त्यापूर्वी बीटरूट ज्यूस प्यायल्याने किंवा सॅलेड घेतल्याने ल्युटीन मिळते, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते. (beetroot)

Eye Care
Child Eye Care: तुमची मुलं देखील जवळून टीव्ही पाहतात? वेळीच घ्या काळजी नाहीतर या आजारांची शक्यता

वाटाणे आणि शेंगदाणे

वाटाणे डोळ्यांना रोग आणि मोतीबिंदूपासून वाचवतात आणि शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई देखील असते ज्यामुळे डोळे निरोगी राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.