Detox Drinks For Liver : यकृत हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. यकृत निरोगी नसेल तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम यकृत करते.
यकृत हा केवळ आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव नाही तर, एक ग्रंथी देखील आहे, जी आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. चांगले कॉलेस्ट्रॉल निर्माण करणे, अतिरिक्त लाल रक्तपेशी काढून टाकणे, पचनास मदत करणे इत्यादी महत्वाची कार्ये सुरळीत करण्याचे काम यकृत करते.