Fruits For Weight Loss : वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे आहे? मग, आहारात 'या' फळांचा करा समावेश

Fruits For Weight loss : सध्याचे वाढलेले धकाधकीचे जीवन, अपुरा आहार, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Fruits For Weight loss
Fruits For Weight lossesakal
Updated on

Fruits For Weight loss : सध्याचे वाढलेले धकाधकीचे जीवन, अपुरा आहार, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. लठ्ठपणा ही त्यातीलच एक मोठी समस्या आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या वाढत्या वजनामुळे त्रस्त झाले आहेत.

वजन वाढले की, हृदयरोग, मधुमेह, कॉलेस्ट्रॉल इत्यादी समस्या सुरू होतात. त्यामुळे, वजन कमी करणे फायद्याचे ठरते. आजकाल अनेक जण वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स, वर्कआऊट्स आणि योगा यांची मदत घेतात.

व्यायाम करण्यासोबतच तुम्ही संतुलित आहार घेणे देखील फायद्याचे आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काही फळांचा देखील समावेश करू शकता.

फायबर्स, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेली ही फळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. या फळांचा तुम्ही आहारात जरूर समावेश करायला हवा. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.

Fruits For Weight loss
Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

कलिंगड (watermelon)

उन्हाळा सुरू झाला की, विविध प्रकारची फळे बाजारात विक्रीला येतात. या फळांमध्ये प्रामुख्याने कलिंगडाचा समावेश असतो. हे कलिंगड खायला सर्वांनाच आवडते. या फळामध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे, याचे सेवन केल्यावर आपले शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी कलिंगड हा सर्वोत्तम पर्याय आहे.

शिवाय, कलिंगडामध्ये असलेले हे फायबर्स पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. या फायबर्स व्यतिरिक्त कलिंगडामध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात. ज्यामुळे, आपल्या शरीराला फायदा होतो.

संत्री (Oranges)

व्हिटॅमीन सी ने समृद्ध असलेले हे फळ आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असते, ज्यामुळे, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

शिवाय, संत्र्याचे सेवन केल्याने  वजन कमी होण्यास मदत होते. जीनसत्वांचा समृद्ध खजिना असलेले हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात संत्रा, संत्र्याचा ज्यूस यांच समावेश करायला विसरू नका.

नाशपाती (Pears)

पोषकतत्वांनी समृद्ध असलेले नाशपाती हे फळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि पाणी आढळते. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच काळ भरलेले राहते.

ज्यामुळे, अनावश्यक गोष्टी खाण्यापासून आपण दूर राहतो. या व्यतिरिक्त नाशपातीमध्ये आढळून येणारे पोषकघटक आपले शरीर निरोगी ठेवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Fruits For Weight loss
Vegan Diet : वीगन डाएट सुरू केल्यानंतर तुमच्या शरीरात होऊ शकतात ‘हे’ बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.