तुम्हीही सोशल मीडिया, ओटीटीचा अतिवापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

झोपायचे तरी किती? प्रकतीवर विपरित परिणाम, मानसिक तणावाचा धोका
social media
social mediasakal
Updated on

नागपूर - झोप तशी सर्वांना प्रिय. मात्र या निसर्गदत्त देणगीकडे व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्रामपासून तर ओटीटी प्लॅटफॉर्मने चिमुकल्यांपासून तर तरूणाईचे झोपेचे पॅटर्न बदलवले. यामुळे झोपेचे यंत्र कधी आणि कसे बिघडले हे कळलेच नाही.

दोन दिवस जागरण करून तिसऱ्या दिवशी झोप भरून काढू असे होत नाही. पुरेसा व्यायाम आणि पुरेशी ७ ते ८ तासांची झोपेसोबत घेतलीच पाहिजे. संतुलित आहार घेणे आवश्‍यक आहे. जंकफूड, कॅफिन, तत्सम पेय, अल्कोहोल सेवनामुळे झोपेचे यंत्र बिघडते. झोपेच्या वेळा ठरलेल्या असावी. खोलीत इलेक्ट्रॉ निक गॅजेटचा (टीव्ही, मोबाईल, आदी) वापर होऊ नये, असे स्लिप मेडिसीन तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले.

निद्रानाशाची व्याधी

झोप व मेंदूचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे झोप अपुरी झाली तर मेंदूचे कार्य बिघडते. त्यामुळे चिडचिड, दिवसा झोप येणे, स्मरणशक्ती मंदावणे, व निद्रानाश, मानसिक तणाव होऊ शकतो. अनेक जण झोपेसाठी दारू पितात. हे घातकच असून नैसर्गिक झोप महत्त्वाची आहे.

कोविड रुग्णांमध्ये ८४ टक्के व्यक्तींना झोपेचा त्रास

कोरोना काळात १२८ रुग्णांच्या झोपेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन सुपरमध्ये केले. निरोगी लोकसंख्येच्या ७३ टक्के लोकांच्या तुलनेत कोविड १९ च्या केवळ ४० रुग्णांना चांगली झोप लागली. निरोगी लोकसंख्येच्या १० टक्क्यांच्या तुलनेत कोविड १९ रुग्णांमध्ये २० टक्के निद्रानाशाची तक्रार आहे. निरोगी लोकांच्या ९८ टक्क्यांच्या तुलनेत कोविड रुग्णांपैकी केवळ ६४ टक्के रुग्णांमध्ये कार्यक्षम झोप दिसून आली. निरोगी लोकसंखेच्या ७० च्या तुलनेत केवळ ५७ कोविड रुग्णांमध्ये ७ तास किंवा त्याहून अधिक झोपेच्या सामान्य कालावधी दिसून आला. निरोगी लोकसंखोच्या ३४ टक्के लोकांच्या तुलनेत कोविड रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांना झोपेचा त्रास प्रामुख्याने दिसून आला.

लहान मुलांचे घोरणे घातक

लहान मुलांसाठी घोरणे अतिशय घातक आहे. चिमुकल्या बाळासाठी १६ ते १८ तास झोप असावी. २ ते १० वयोगटातील लहान मुलांना सुमारे १० ते १२ तास आवश्‍यक तर १० ते २० वयोगटातील मुलांसाठी ८ ते १० तास झोप बरी आहे. त्यापुढे वयस्क व्यक्तींना दररोज सात तास झोपेची गरज आहे.

झोप कशासाठी

  • मुलांमध्ये चयापचय नियमनासाठी व्यायाम आणि पोषणाप्रमाणेच झोप आवश्यक आहे.

  • झोपेचा कालावधी कमी झाला की, बालपणातील लठ्ठपणा वाढतो.

  • आरोग्य राखण्यासाठी झोपेच्या दरम्यान नियमितपणे श्वास घेणे महत्वाचे आहे .

  • झोपेच्या आजाराचा दुष्परिणाम व्यक्तिगत व सामाजिक असतात.

  • ऑब्स्टुक्टिव्ह स्लीप ॲप्नियामध्ये श्वास थांबतो, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व हृदयावर ताण येतो.

  • झोपेच्या विकारावर ‘पॉली सोनोग्राफी''चे निदान प्रभावी आहे.

असे धोके संभवतात

  • झोपेची गुणवत्ता बिघडल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका

  • श्वास विकार रुग्णांना फुफुसाचा रक्तदाबाची जोखीम

  • आकस्मात हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका

झोप न येणे, झोपेत श्‍वास थांबणे, खाटेवर पडल्यानंतर तत्काळ झोप येणे, झोपेत फिट येणे, घोरणे, दैनंदिन लयींचे आजार, झोपेत असताना अचानक मेंदू जागा होणे याचे निदान होते. यानंतर किती तास झोप घेतली, यापेक्षा ती झोप व्यवस्थित कशी होईल'', याकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. क्वालिटी ऑफ स्लिप''साठी झोपेच्या व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. सुशांत मेश्राम, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख व निद्रारोग तज्ज्ञ, मेडिकल-सुपर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.