माझे वय १७ वर्षे आहे. केली १-२ वर्षे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास जाणवतो आहे. पाळी यायच्या सुमारात पिंपल्स फार प्रमाणात वाढतात. पाळी येऊन गेल्यावर काही प्रमाणात कमी होतात, पण येऊन गेलेल्या पिंपल्सचे डाग चेहऱ्यावर राहतात. यावर काय उपाय करता येईल, तसेच आहारात नेमकी काय काळजी घ्यावी हेही सांगावे....
- मृण्मयी अबनावे, मुंबई
उत्तर : शरीरात झालेल्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तसेच रक्तात असलेल्या दोषामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास तरुण पिढीत जास्त दिसतो. रक्तातील दोष तसेच शरीरातील उष्णता कमी कमी होण्याच्या दृष्टीने संतुलन पित्तशांती गोळ्या नियमित घ्याव्या. रात्री झोपताना अविपत्तिकर चूर्ण घेण्याचा उपयोग होऊ शकेल. रक्तातील दोष कमी होण्याच्या दृष्टीने मंजिष्ठासॅन, अनंतसॅन किंवा संतुलन अनंत कल्प टाकून घेतलेले दूध घेण्याचा फायदा होऊ शकेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून चेहऱ्यावर संतुलन राधा फेस तेलासारखे तेल हलक्या हाताने लावावे. आहारातून तेलकट, खूप तिखट, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, वांगे, चिंच, दही वगैरे वर्ज्य करणे बरे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी उपचार घेणे उत्तम. बरोबरीने संतुलन फेमिसॅन तेलासारख्या तेलाचा पिचू ठेवावा.