कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार जग चिंतेत आहे. रोज काहीतरी नवीन भिती असते की, आज काय होणार? कधी अल्फा(Alpha), कधी डेल्टा(Dela) आणि कधी ओमीक्रॉन (Omicorn). जगभारातील शास्त्रज्ञांना कोरोनाने मोकळा श्वास घ्यायलाही वेळ दिला नाही. त्यातच आता इस्रायलमध्ये (Israel) प्लोरोनाचे (Flueron) भय निर्माण झाले आहे. फ्लोरोनाबाबत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरस कोरोनाचा नवीन व्हेरिअंट नाही, पण त्याचा संसर्ग दुहेरी असल्याचे दिसतेय जिथे कोरोनासोबत इन्फ्लुएंजाचा (Influenza) व्हायरसचा एकाच वेळी संसर्ग झाला आहे. हे किती भयानक असू शकते आणि त्याचे लक्षण काय आहेत जाणून घ्या
इस्रायलमधून मिळालेल्या रिपोर्टनुसार हॉस्पिलमध्ये दाखल झालेल्या गर्भवती महिलमध्ये कोरोना आणि इन्फ्लूएनचे प्रकरण असल्याचे दिसते. ओमिक्रॉन बाधितांच्या संख्या वाढल्यामुळे आणि डेल्टा व्हेरिअंट संक्रमण सुरु असताना या सहसंक्रमणामुळे भिती निर्माण होणे स्वाभाविक आहे. रिपोर्टनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलमध्ये इन्फ्यूएंजा बाधितांची संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. दोन्ही संक्रमण एकत्र झाल्यामुळे इम्युनिटी कमी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, जी महिला बाधित झाली आहे तिने कोणत्याही प्रकारची लस घेतली नव्हती.
यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अन्ड प्रवेन्शन (सीडीसी) चे म्हणणे आहे की, आजाराची लक्षण समोर येण्यासाठी १ ते २ दिवस लागतात. जर व्यक्तीला ताप असेल तर कोरोना संक्रमणाच्या बाबतीत लक्षणे दिसण्यासाठी जास्त वेळ लागतो. फ्लूमध्ये व्यक्तीला १ ते ४ दिवसांमध्ये लक्षणे दिसतात. तेच कोरोना संक्रमनाच्या बाबतीत लक्षण दिसण्यासाठी ५ दिवस लागतात. तसे सहसा संक्रमणानंतर २ ते १४ दिवसांमध्ये दिसतात.
सीडीसचे म्हणणे आहे की, दोन्हीहीमध्ये लक्षण दिसण्याआधीच एक व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमण होऊ शकते. असे लोक देखील आहेत ज्यांच्यामध्ये लक्षण खूप सौम्य असतात किंवा ते त्यांना लक्षण दिसत नाही. दोन्हीहीमध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास आणि त्याची शिंक, खोकला किंवा कफातून उडणाऱ्या छोट्या शिंतोड्यामधून संक्रमण होते. संक्रमित जागेला स्पर्श केल्या आणि नंतर ते नाक, डोळी किंवा थोंडाला स्पर्श केल्यास देखील संक्रमण होऊ शकते.
कोरोना काळात फ्लोरोना विषाणू आढळल्यामुळे तज्ज्ञाची चिंता वाढली आहे. त्यांचे मत आहे की, व्हायरससोबत संक्रमण हे नैसर्गिक असते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात
तज्ज्ञ ट्विन्डेमिक म्हणजेच दोघे विषाणूच्या संसर्गाबद्दल चिंतेत होते. पण सामजिक अंतर आणि इतर उपायांमुळे असे काही झाले नाही. अशातच निर्बंध शिथील झाले आणि लोक निष्काळजी झाले. त्याचा परिणाम आहे की दुसरे विषाणूही पसरण्याची संधी मिळाली.
अमेरिकेमध्ये 2020-21मध्ये फ्लू च्या प्रकरण साधरणपेक्षा कमी होते कारण लोक मास्क लावत होते आणि सामजिक अंतर राखत होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दोन आजार एकाच वेळी होणे शक्य आहे आणि दोन्ही व्हायरसची लक्षण एक सारखी असतात ज्यामध्ये कफ, नाक गळणे, घसा दुखणे, ताप, डोके दुखी आणि थकवा जाणवत असे. पण लक्षण लोकोंच्या हिशोबाने बदलतात. काही लोकांमध्ये काहीच लक्षणे नाही दिसत, तर काहींमध्ये सौम्य लक्षण असतात आणि काही लोकांना गंभीर स्वरूपात आजारी असतात. त्यामुळे दिसून येते की, कोरोनासोबक इन्फ्लूएंडा धोकादायक ठरू शकतो. नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे सूचित केले आहे की, दोन्ही विषाणू हवेतून पसरतात आणि श्वसनमार्गाच्या पेशी, नाकपुड्या, ब्रॉन्किओल्स आणि फुफ्फुसांवर हल्ला करतात. अशा प्रकारे, दोन विषाणूंच्या संगमामुळे मोठ्या लोकसंख्येला संसर्गाचा धोका होऊ शकतो.
नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उंदरांवर केलेल्या प्रयोगातून असे दिसून आले आहे की इन्फ्लूएंझा संसर्गामुळे SARS-Covi-2ची संवेदनशीलता वाढते. यामुळे कोविडचा विषाणूजन्य भार वाढतो, ज्यामुळे फुफ्फुसांना गंभीर नुकसान होऊ शकते. संशोधकांनुसार, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इन्फ्लूएंझामध्ये कोविडचा प्रसार वाढवण्याची अद्वितीय क्षमता आहे, त्यामुळे कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्फ्लूएंझा नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. आरोग्य मंत्रालयाच्या देशात दरवर्षी ऋतुनुसार आजार येतात. गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे आता त्यांच्याशी संबंधित आजार अधिक प्राणघातक बनू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविडच्या बाबतीत त्यांचे सहअस्तित्व दाखवले जात नाही, त्यामुळे उपचारात अडचण येऊ शकते.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा गंभीर तीव्र श्वसन संसर्ग (SARI) किंवा इन्फ्लूएंझा सारख्या (ILI)आजारप्रमाणे दिसू शकतो. ज्या भागात अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तेथे दोन्ही रोगांची तपासणी करणे आवश्यक आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने, या काळात इन्फ्लूएन्झा अधिक दिसू शकतो. काहींना दोन्हीची लक्षणे असू शकतात. तथापि, दोन्हीची लक्षणे सारखीच असल्याने, प्रयोगशाळेतील चाचण्याही फारशी मदत करू शकत नाहीत.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दोन्ही संसर्गाची माहिती स्वतंत्र पीसीआर चाचणी करूनच घेतली जाऊ शकते. तथापि, CDCने म्हटले आहे की. वातावरणाच्या बदलामुळे झालेला फ्लू प्रकार Aआणि Bआणि SARS CoV 2 बद्दल शोधण्यासाठी चाचण्या केल्या जात आहेत. यूएस सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत खबरदारी म्हणून याचा वापर केला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितनुसार, सर्व वयोगटांना सह-संसर्गाचा धोका आहे आणि वृद्ध, गरोदर स्त्रिया, ज्यांना कोणताही आजार आहे. कमकुवत रोग प्रतिकारशक्ती असलेले लोक, आरोग्य कर्मचारी आणि ज्यांचा नुकताच जन्म झाला अशा मुलांना जास्त धोका आहे. उपचारांच्या बाबतीत, कोरोनावर जगभरात उपचार केले जात आहेत, ज्यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा समावेश आहे, परंतु इन्फ्लूएंझा झाल्यास, अँटीव्हायरल औषधे देऊन रोगाची तीव्रता आणि मृत्यूचा धोका कमी केला जाऊ शकतो. तथापि, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत ते घरी स्वतःच बरे होऊ शकतात. आता गरज आहे ती फक्त लसीकरणासाठी आग्रही राहण्याची.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.