Alcohol Causes : अल्कोहोलमुळे मेंदूत होतो केमिकल लोचा, जाणून घ्या काय आहे अल्कोहोल ब्लॅकआऊट

दारूचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही
Alcohol Causes
Alcohol Causes esakal
Updated on

Alcohol Causes : दारूचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. हे मद्यपान शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतेच, शिवाय यामुळे आपण यकृत आणि हृदयाच्या आजारांनाही बळी पडतो. आता दारूमुळे एक नवीन समस्या निर्माण होते आहे. दारूने आपल्या मेंदूवर थेट हल्ला करायला सुरुवात केली आहे. दारूच्या अतिसेवनामुळे आपल्या मेंदूतील रसायनावर परिणाम होत आहे.

अनेकदा तुम्ही लोकांना नशेत झुलताना पाहिलं असेल. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. मद्यधुंद अवस्थेत असणारे लोक पुन्हा नॉर्मल दिसतात. एवढंच नाही तर यापैकी काही लोकांना नशेत असताना काय केलं ते आठवतही नाही. वैद्यकीय भाषेत त्याला अल्कोहोल ब्लॅकआउट असं म्हणतात. याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होणारी वाढ पाहता, त्यावर संशोधन करण्यात आलं असून, या समस्येला अधिकाधिक तरुण बळी पडत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

Alcohol Causes
Ayurveda Health Tips: तुम्हाला तंदुरूस्त राहायचं का? आयुर्वेदातील पंचसूत्रीचा अवलंब करा; स्वत:साठी वेळ द्या, वाचेल दवाखान्याचा खर्च

अल्कोहोल ब्लॅकआउट काय आहे

जेव्हा एखाद्या व्यक्तीने जास्त मद्यपान केले असेल आणि तो खूप नशेत असेल तर त्याला ब्लॅकआउटची व्याख्या लागू होते. वास्तविक, अति मद्यपान केल्यामुळे, आपल्या मेंदूचा एक महत्त्वाचा भाग हिप्पोकॅम्पस काम करणं थांबतो. हिप्पोकॅम्पस हा एक भाग आहे ज्यात आपल्या आठवणी असतात.

Alcohol Causes
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग या टिप्स नक्की फॉलो करा Monsoon Travel

क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान हे कारण

अल्कोहोल ब्लॅकआउटवर संशोधन करणार्‍या अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोल अब्यूजचे आरोन व्हाईट यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही नशा केल्यानंतर जर तुम्ही केलेली कृती किंवा बोलणं तुम्हाला आठवत नसेल, तर ते ब्लॅकआउटच लक्षण आहे. एकतर तुम्हाला त्याचा त्रास होत आहे किंवा झाला आहे. ते म्हणतात की जेव्हा लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान करतात तेव्हा अल्कोहोल ब्लॅकआउटचा प्रभाव सर्वात जास्त दिसून येतो. अशा स्थितीत त्यांना काहीच आठवत नाही. अॅरॉन व्हाईटने आपल्या संशोधनात एक हजार विद्यार्थ्यांचा समावेश केला होता, असे समोर आले की 66 टक्क्यांहून अधिक लोक दारू पिल्यानंतर अर्धवट ब्लॅकआउटचे बळी ठरले.

Alcohol Causes
Parenting Tips : हातातून बाळ निसटेल म्हणून भीती वाटते? बाळाला अशी घाला अंघोळ!

अल्कोहोल केमिकल लोचा

हेडलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये अल्कोहोलचा मेंदूवर होणाऱ्या परिणामावरही एक संशोधन करण्यात आले आहे. यात संशोधक हेल्मुटने सांगितले आहे की अल्कोहोलमध्ये इथेनॉल असल्यास ते शरीरात पोहोचताच रक्तामध्ये पूर्णपणे विरघळते. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के असते, त्यामुळे दारूची नशा लगेच मेंदूपर्यंत पोहोचते.

Alcohol Causes
Stomach Health Tips : पोटातून येतो गुरगुरण्याच्या आवाज, तुम्हाला हा आजार तर झाला नाहीय ना?

न्यूरोट्रांसमीटर प्रभावित होतात

दारूची नशा मेंदूपर्यंत पोहोचल्यावर त्याचा मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम होऊ लागतो. याचा मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि दारू पिणारा गोंधळलेल्या अवस्थेत जातो. तो काय करतोय ते त्याला समजत नाही. त्यामुळे मद्यपान करणाऱ्याचे शरीर थरथर कापू लागते, आवाज तोतरा होऊ लागतो आणि पाय स्तब्ध होऊ लागतात. जेव्हा अल्कोहोलचे प्रमाण वाढते तेव्हा मज्जासंस्थेचे कार्य पूर्णपणे थांबते तेव्हा ब्लॅक आउट परिस्थिती निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.