Woman Health : बाळंतपणात वाढतं वजन? ऐश्वर्या ते आलिया, हे पदार्थ खात कमी केलं वजन

तुम्हाला माहितीये काय ऐश्वर्या ते आलिया या सेलिब्रिटीजने बाळंतपणानंतर त्यांचे वाढलेले वजन कसे कमी केले ते
Woman Health
Woman Healthesakal
Updated on

Women Health : बाळंतपणानंतर अनेकांचं वजन वाढतं. ते कमी करण्यासाठी महिला विविध उपाय करत असतात. मात्र नुकत्याच आई झालेल्या महिलेला बाहेर जीमला जाणे किंवा हार्ड वर्कआऊट करणे शक्य नसते. मात्र तुम्हाला माहितीये काय ऐश्वर्या ते आलिया या सेलिब्रिटीजने बाळंतपणानंतर त्यांचे वाढलेले वजन कसे कमी केले ते. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

डिलीव्हरीनंतर वजन कसे कमी कराल

आलिया म्हणते अनेकांना वाटतं की डिलीव्हरीनंत वजन आपोआपच कमी होतं. मात्र असे काही नाही. Vogue India दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने सांगितले की, ती ज्या क्षेत्रात आहे त्या करिअरमध्ये तिला तिची शरीरयष्टी सांभाळावी लागते. प्रेग्नंसीदरम्यान तिला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले.

Woman Health
Alia Bhatt Daughter News : अखेर 'राहा'चा चेहरा चाहत्यांना दिसणार? अभिनेत्रीने तिच्या मुलीबद्दल केले अनेक खुलासे

आलियाने तिचे वजन असे कमी केले होते

आलियाने सांगितले की तिला डॉक्टरांनी डिलीव्हरीच्या १२ आठवड्यानंतर वर्कआऊठ करायला सांगितले होते. ती रोज पंधरा मिनिटे वॉक आणि ब्रिदींग एक्सरसाइज करत होती ज्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो.

यासोबतच आलियाने असेही सांगितले की, तिची सासू नीतू कपूर यांनी प्रेग्नेंसीनंतर 6 आठवडे तिला डिंकाचे लाडू बनवून खायला दिले. आलियाने तिच्या वजन कमी होण्याचे श्रेय तिच्या सासूने बनवलेल्या डिंकाच्या लाडूंनाही दिले. हे लाडू बनवायचे कसे जाणून घेऊया.

Woman Health
Woman Health

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारी सामग्री

हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला घ्यावे लागेल

डिंक - 125 ग्रॅम, भाजलेले पीठ - 1000 ग्रॅम, वेलची - 25 ग्रॅम, बडीशेप - 25 ग्रॅम, अळीव दाणे - 50 ग्रॅम, खसखस ​​- 25 ग्रॅम, बदाम - 125 ग्रॅम, काजू - 125 ग्रॅम आवश्यक आहे. तूप - 500 ग्रॅम, किसलेला गूळ - 500 ग्रॅम, किसलेले कोरडे खोबरे - 500 ग्रॅम.

डिंकाच्या लाडूची रेसिपी

प्रथम किसलेले खोबरे चांगले भाजून घ्यावे. नारळाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत हे करा. त्याचप्रमाणे बदाम, काजू, वेलची, खसखस, खजूर, बडीशेप, अळीव बिया भाजून घ्याव्यात. हे सर्व नीट भाजून झाल्यावर ग्राइंडरमध्ये एकत्र करून बारीक पावडर होईपर्यंत बारीक करा. आता एका मोठ्या भांड्यात थोडे तूप गरम करा. (Pregnancy)

तूप चांगले गरम झाल्यावर त्यात थोडा डिंक टाका. एका वेळी फक्त थोडासा डिंक घाला. गरम तुपात थोडा डिंक घातल्यावर काही सेकंद शिजू द्या. ते ढवळत राहा, फुगले की वेगळ्या भांड्यात काढा. आता उरलेला डिंक त्याच प्रकारे तळून घ्या.

Woman Health
Weight Loss : मधुमेहाच्या रूग्णांनी वजन कमी करण्यासाठी वापरा या 4 ट्रिक्स, हृदयावर ताण पडणार नाही

लाडू बनवण्याची पद्धत

डिंक शिवजवून घेतल्यानंतर त्याच भांड्यात अजून थोडं तूप गरम करून त्यात गूळ घाला. (Weight Loss) गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळून घ्या. उकळायला लागल्यावर गॅस बंद करा आणि डिंकासह वितळलेला गूळ भांड्यात घाला आणि चमच्याने चांगले मिसळा. ग्राइंडरमध्ये टाकून त्यांची पावडर बनवा. तुमच्या तळहातावर तुपाचे काही थेंब घेऊन एकत्र चोळा. पिठाचे छोटे गोळे घेऊन लाडू बनवा. हे लाडू तुम्ही खोलीच्या तापमानाला हवाबंद डब्यात ठेवू शकता. एका दिवसात सुमारे 1 ते 2 लाडू खाल्ल्याने तुम्हाला बाळंतपणानंतर आवश्यक ऊर्जा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.