Alu Leaves Benefits : अळूची पानं या विकारांवर रामबाण उपाय, वाचा जबरदस्त फायदे

आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.
Alu Leaves Benefits
Alu Leaves Benefitsesakal
Updated on

Alu Leaves Benefits : अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नसते, परंतु या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते; जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

अळूच्या भाजीचे दोन प्रकार आहेत. रानटी आणि लागवड केलेली. लागवड केलेल्या प्रकाराच्याही दोन जाती असतात. त्यापैकी एकाची पाने आणि देठ हिरव्या रंगाचे; तर दुसरे जांभळ्या रंगाचे असतात. आळूची पाने ही दिसायला कमळासारखी असून, देठ लांब असतो.

अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते. कुरकुरीत, खमंग अळूवडी सर्वांनाच आवडते. पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यात अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाचे अळू हे अळूवडीसाठी वापरले जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठी वापरली जातात.

या विकारांवर फायदेशीर

१. ब्लड प्रेशर :

अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्त्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या होत नाही.

२. दृष्टी :

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होतात.

Alu Leaves Benefits
Stomach Health Tips : पोटातून येतो गुरगुरण्याच्या आवाज, तुम्हाला हा आजार तर झाला नाहीय ना?

३. पोटाच्या समस्यांवर फायदेशीर :

तुम्हाला पोटाच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

४. सांधेदुखीवर गुणकारी :

तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.

Alu Leaves Benefits
Health Care News: तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? होऊ शकतात हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

५. वजन कमी करण्यासाठी :

अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Health)

६. कॅन्सरचा धोका कमी

अळूच्या कंदात पॉलीफिनॉल्स विपुल प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. ट्यूमरसदृश्य पेशीही अळूच्या कंदाच्या सेवनाने कमी होतात.

७. पचन तंत्र सुधारते

अळूचे कंद आहारात असल्याने शरीराला तंतुमय घटक मिळतात, त्यामुळे पचन तंत्र सुधारते. शिवाय अन्नाचे पचन करण्यासही ते मदत करतात. पोटात गॅस होणे, मुरडा मारणे, जुलाब यासारख्या पोटाच्या आजारात ही भाजी खाणे खूप उपयुक्त मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.