Gawar Benefits : शरीर सुदृढ राहण्यासाठी डॉक्टर नेहमीच हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी नाही, तर अनेक गंभीर आजारांशीही लढण्यासाठी मदत करतात. भारतात पालेभाज्या, फळभाज्यांचा रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यात गवारीची भाजी म्हटले की, अनेकांची नाके मुरडतात.
मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, हीच गवार आरोग्यासह कमोडिटी बाजारातही किती महत्त्वाची आहे. त्यामुळे गवारीचे महत्त्व आहारापासून व्यवहारापर्यंत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता रोज दीड क्विंटल गवारीची आवक उत्तर कर्नाटकसह जतमधून कृषी उत्पन्न बाजार समितीत होते.