अन्नातील ‘प्राणिक’ ऊर्जा आणि शरीर

अमेरिकेमध्ये अनेक दिग्गज आरोग्यतज्ज्ञांनी ‘लिव्हिंग फूड्स’ ही विचारसारणी मांडली आहे आणि आपण असे जिवंत म्हणजेच नैसर्गिक ऊर्जेने भरपूर अन्न सेवन केल्यास आपल्या पेशींना योग्य ऊर्जा मिळते.
Vegetable Fruits
Vegetable Fruitssakal
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे आपल्याला अन्न दोन स्तरांवर बघावे लागेल. स्थूल (अन्नातील जड तत्त्व जे आपण बघू शकतो व ज्याला स्पर्श करू शकतो, ज्याला चव असते) आणि सूक्ष्म (अन्नातील प्राणिक ऊर्जा).

निसर्गात कोणतेही धान्य, फळे, भाज्या उगवतात, तेव्हा त्यामध्ये प्राण ऊर्जा भरभरून वाहत असते.

निसर्गत: जे जसे तयार होते तसे त्यातून ऊर्जा मिळवणे आपल्या शरीराला सोपे जाते, त्याला आपण ‘जिवंत अन्न’ किंवा ‘प्राणयुक्त’ अन्न म्हणू शकतो (उदा. मोड आलेले कडधान्य, फळे इत्यादी). याचे सेवन केल्यास आपल्याला प्राण ऊर्जा मिळण्यास मदत होते.

आपण अन्न शिजवू लागलो- कारण आपल्याला पचनासाठी काही प्रमाणात शिजवलेले अन्न सोपे पडतात (उदा. भाज्या थोड्या उकडून खाणे); परंतु आपण अन्न अती प्रमाणात शिजवतो किंवा त्यावर अतिरिक्त प्रोसेसिंग करतो (उदा. गव्हापासून बनवलेल्या मैद्याचे बिस्कीट), तेव्हा मात्र शरीराला ते पचविणे कठीण जाते आणि त्यातून काहीही ऊर्जा मिळत नाही. त्यातील न पचवता आलेले पदार्थ शरीरात आम म्हणजेच toxins म्हणून साठून राहतात आणि आपले शरीर आजारांचे माहेरघर बनते.

अमेरिकेमध्ये अनेक दिग्गज आरोग्यतज्ज्ञांनी ‘लिव्हिंग फूड्स’ ही विचारसारणी मांडली आहे आणि आपण असे जिवंत म्हणजेच नैसर्गिक ऊर्जेने भरपूर अन्न सेवन केल्यास आपल्या पेशींना योग्य ऊर्जा मिळते, चयापचय सुधारते, जुनाट आजार कमी होऊ लागतात आणि आरोग्याकडे आपण प्रवास करतो असे सांगितले आहे.

जिवंत अन्न/ पॉझिटिव्ह प्राणिक अन्न कोणते?

सर्व धान्य, फळे, भाज्या, सुका मेवा, सेवनयोग्य बीजे (सूर्यफूल बीज, टरबूज बीज), मोड आलेली कडधान्ये इत्यादी. हे सर्व अन्न जिवंत अशा अर्थी आहे, की या सर्वांमध्ये नवे जीवन तयार करण्यासाठी लागणारे घटक आणि ऊर्जा आहे. कोणत्याही फळाची बी, धान्य जमिनीत पेरले, तर त्यातून एक नवे जीवन उमलते; पण आपण बिस्किट पेरले, तर त्यातून नवा जीव उमलू शकतो का? नाही! म्हणून त्यातून आपल्यालाही प्राणिक ऊर्जा मिळत नाही.

आपण वरीलपैकी कोणतेही कच्चे अन्न शिजवतो, तेव्हा आपल्यासाठी ते पचनयोग्य बनते; परंतु शिजवण्याच्या प्रक्रियेत अन्नातील प्राणिक ऊर्जेचा काही प्रमाणात नाश होतो. शिजवल्यानंतर जशी वेळ पुढे जाईल, तसे त्यातील ‘प्राणतत्त्व’ संपत जाते.

भगवान श्रीकृष्ण भगवद्‍गीतेमध्ये सांगतात, अन्न शिजवल्यानंतर साधारण अडीच तासांत ते सेवन करावे, त्यानंतर ते तामसिक (ऊर्जा काढून घेणारे, निगेटिव्ह प्राणिक) होऊ लागते, म्हणजे त्यातील प्राणिक ऊर्जा संपू लागते, त्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात; पण आपण आजकाल किती साठवून ठेवलेले, पॅक केलेले, अनेक दिवसांपूर्वी तयार झालेले अन्न खात आहोत म्हणजे एका अर्थी आपण ‘प्राण’ नसलेले, ‘जीव’ नसलेले अन्न खात आहोत. पॅकेटमधील बिस्किटे, चिप्स, थंड पेये, प्रीझर्वेटिव्हयुक्त सर्व सॉसेस, चटणी, फ्रोजन अन्न इत्यादी हे पदार्थ अत्यंत निर्जीव बनलेले असतात.

आपण वारंवार असे निर्जीव पदार्थ खातो, त्यामुळे आपले वजन वाढते; पण तरीही आपल्याला सतत भूक लागत राहते, आतमध्ये एक रिकामेपण भासते. ही भूक यामुळेच लागते, की आपण आज सेवन करत असलेले अन्न प्राणिकदृष्ट्या जिवंत नाही. आपल्या इंद्रियांना हे खाऊन बरे वाटते व पोट भरतेसुद्धा; पण प्राण ऊर्जा मिळत नाही.

एक प्रयोग म्हणून आपण दररोज सकाळी चहाऐवजी कोहळ्याचा रस पिऊन पाहावा आणि मध्ये कधीही भूक लागली, तर पॅकेज्ड अन्न खाण्याऐवजी फळे, सुका मेवा खावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.