Health: प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमीच होईना? तर 'या' पेयाचे करा सेवन, मिळतील अनेक फायदे

अनेक महिलांना गर्भधारणेदरम्यान आणि मुलाला जन्म दिल्यानंतर वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
Apple Cider Vinegar try these ways to lose your weight after pregnancy
Apple Cider Vinegar try these ways to lose your weight after pregnancy
Updated on

आई झाल्यानंतर प्रत्येक महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलते. तिच्या जीवनशैलित मोठा फरक पडतो. त्यामुळं अनेक महिलांना गर्भधारणेदरम्यान आणि मुलाला जन्म दिल्यानंतर वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः गर्भधारणेनंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढू लागते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात.

योगा, जिम, चालणं अनेक मार्ग निवडलं जातात पण काहि केल्या वजन कमी होण्याचं नावच घेत नाही. अशा वेळी या स्थितीतून कशी सुटका होणार या विचाराने अनेक महिला त्रस्त असतात. तर आज आम्ही प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं वजनच काय तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.

टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने इंस्टाग्रामवरील एका जुन्या व्हिडिओमध्ये प्रसूतीनंतरच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. गर्भधारणेनंतर तिने 11 किलो वजन कमी केले होते. शेवटचे ४-५ किलो वजन कमी करण्यासाठी तिनं सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर केला. अॅपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया ऍपल सायडर व्हिनेगरचे फायदे.

Apple Cider Vinegar try these ways to lose your weight after pregnancy
Women Health : महिलांनो, मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी करा ही तीन योगासने...

थायरॉईडची समस्या दूर होते

प्रसूतीनंतर अनेक महिलांना थायरॉईडची समस्या उद्भवते. या काळात त्यांना चिंता, थकवा, चिडचिड आणि वजनातील चढउतार यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत अॅपल सायडर व्हिनेगर पोटाची ऍसिडिटी राखते. एवढेच नाही तर ते पचन आणि पोषक तत्वांचे शोषण देखील सुधारते. थायरॉईड ग्रंथीवरील ताण कमी करण्यासाठी हे खूप चांगले पेय आहे.

वजन कमी होते

सर्व प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर अॅपल सायडर व्हिनेगर हा उत्तम पर्याय आहे. हे चयापचय सक्रिय करते आणि शरीरात चरबी साठवण्याऐवजी ऊर्जा म्हणून वापरते. यात भूक शमविण्याची चांगली क्षमता आहे. याचे सेवन केल्याने पचन मंदावते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

Apple Cider Vinegar try these ways to lose your weight after pregnancy
Women Health : स्त्रियांनो, 'PCOD' चा त्रास कसा कराल कमी? या योगासनांची घ्या मदत

पचनसंस्था सुधारते

आम्लयुक्त असल्याने पचनक्रिया सुधारते. विशेषतः प्रथिनेयुक्त अन्न पचवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण लक्षात ठेवा की ते कसे, कधी आणि किती प्रमाणात घ्यावे, याची माहिती डॉक्टरांकडून नक्कीच घ्या.

यूरिन इन्फेक्शन

बाळाच्या जन्मादरम्यान महिला UTI ची अधिक तक्रार करतात. प्रसूतीदरम्यान मूत्रमार्गात बॅक्टेरियाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, अॅपल सायडर व्हिनेगर संसर्ग टाळण्यासाठी एक चांगला उपाय आहे.

Apple Cider Vinegar try these ways to lose your weight after pregnancy
Women Health: कुटुंबीयांसोबत सांभाळा स्‍वत:चे आरोग्‍य; दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा घ्यावा सल्ला

ऊर्जा मिळते

गर्भधारणेनंतर, महिलांमध्ये उर्जेची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास शक्ती मिळते. याशिवाय यामध्ये आढळणारे अमीनो ॲसिड शरीरात लॅक्टिक ॲसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

अॅपल सायडर व्हिनेगर महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक समस्यांचा थेट वजन वाढण्याशी संबंध नसतो. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने वजन तर कमी होतेच शिवाय अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.