Yoga Tips for Office : आपले पाय हे आपल्या शरीराचे आधारस्तंभ आहेत जे दिवसभर आपल्या शरीराचे वजन उचलतात आणि आधार देतात. ऑफीसमुळे आपली जीवनशैली इतकी बैठी झाली आहे की आपल्या दिनचर्येत शारीरिक हालचाल फार कमी होते अन् परिणामी आपले पाय दुखतात. म्हणूनच आपले पाय मजबूत करण्यासाठी आणि त्यांची सहनशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत.
योग हा आपल्या संपूर्ण शरीरात, विशेषत: आपल्या पायांमध्ये शक्ती निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. योगासने केल्याने तुमच्या पायातील स्नायू टोन होण्यास मदत होते, ज्यात तुमचे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंगचा समावेश होतो. या आसनांमुळे तुम्ही तुमचे पाय, नितंब आणि मांड्या यांच्या स्नायूंना उत्तेजित करू शकता.
१. सूर्यनमस्कार
योगाभ्यासासाठी तुम्ही सूर्यनमस्काराने सुरुवात करू शकता. हे करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्योदयापूर्वी. तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी सूर्यनमस्कार हे एक उत्तम योग तंत्र आहे. यामुळे संपूर्ण शरीर टोन करता येते, वजन कमी करण्यास मदत होते आणि स्नायू आणि सांधे मजबूत होऊ शकतात.
जर तुम्ही नवशिक्या असाल, तर तुम्ही 5 वेळा सुर्यनमस्कार करा आणि नंतर हळूहळू सरावाने संख्या वाढवू शकता. सूर्यनमस्कारात १२ योगासने असतात-
२. उत्कटासन
उत्कटासन करण्यासाठी, पाय एकत्र ठेवून उभे रहा.
आता हात नमस्काराच्या मुद्रेत आणा.
आता आपले हात आपल्या डोक्यावर वर करा.
या दरम्यान तुमचे तळवे एकमेकांना जोडले पाहिजेत.
आता हळू हळू गुडघे वाकवा
तुमच्या मांड्या जमिनीला समांतर असाव्यात.
या आसनात 10-15 सेकंद राहा आणि नंतर विश्रांतीच्या स्थितीत या.
३. प्रपाद आसन (Tip Toe Pose)
मलासन किंवा वज्रासनाने सुरुवात करा.
हळू हळू आपल्या टाच जमिनीवरून उचला.
तुमच्या पायाच्या बोटांवर तुमचे शरीर संतुलित करा आणि तुमची पाठ सरळ ठेवा.
तुमचे तळवे एकत्र करा आणि तुमच्या भुवयांमध्ये लक्ष केंद्रित करा.
10-20 सेकंद या पोझमध्ये रहा.
या पोझमधून बाहेर येण्यासाठी, तुमची टाच खाली करा आणि मलासनात परत या.
ही स्थिती 3 सेटसाठी पुन्हा करा.
४.वृक्षासन
जमिनीवर सरळ उभे रहा.
आपला उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा.
या दरम्यान, तुमचा डावा पाय सरळ असावा ज्यामुळे तुम्हाला शरीराचा समतोल राखता येईल.
या पोझमध्ये असताना खोलवर श्वास घेत राहा. आता तुमचे हात तुमच्या डोक्यावर वर करा आणि 'नमस्कार' पोझमध्ये तुमचे तळहात एकत्र करा.
या दरम्यान, संपूर्ण शरीर ताणले पाहिजे आणि पाठीचा कणा सरळ ठेवावा.
30 सेकंद या आसनात रहा. श्वास सोडताना, आसनातून सामान्य स्थितीत परत या.
दुसऱ्या पायाने या स्टेप्सची पुनरावृत्ती करा.
५. एक पदासन
आपली कंबर सरळ ठेवा आणि हात वर करताना आपले तळवे नमस्कार पोझमध्ये आणा.
श्वास सोडताना, तुमचे वरचे शरीर जमिनीच्या समांतर होईपर्यंत वाकवा.
आपले हात आपल्या कानाजवळ ठेवा.
तुमचा उजवा पाय हळू हळू वर उचला आणि सरळ ठेवा.
तुमचा उजवा पाय, शरीराचा वरचा भाग आणि हात सरळ रेषेत असावेत.
समतोल राखण्यासाठी, तुमची नजर एका बिंदूवर केंद्रित करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.