Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल नामाने वाढते हृदयाची ताकद, जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुमाऊलीच्या जप वारकरी सुमारे दीडशे किलोमीटर चालत जात करतात.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024esakal
Updated on

Health Benefits Of Chanting Vitthal Name : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुमाऊलीच्या जप वारकरी सुमारे दीडशे किलोमीटर चालत जात करतात. मनापासून केलेल्या या नाम जपाने जसे मनाला बळकटी मिळते तशीच बळकटी हृदयालाही हे नाम देते.

हा फक्त भाव नसून अभ्यासातून, संशोधनातून सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विठ्ठल नामाचा हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे.

वेद विज्ञान संशोधन केंद्राकडून हा अभ्यास करण्यात आला आहे. यात केंद्राचे प्रमुख पंडित प्रसाद जोशी, माईर्स मेडिकल कॉलेजचे डॉ रवी प्रयाग, सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्सचे सुधीर नेऊरगावकर, ग्लोबल हेल्थच्या संशोधनक डॉ. ज्युथिका लघाटे, रॉयल पुणे नीतिशास्त्र समितीचे प्रमुख डॉ. पंकज जगताप आदींचा सहभाग होता.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi : पंढरपुरात वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विखेंसोबत खेळली 'फुगडी'

त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल नामाच्या उच्चारामुळे हृदयाच्या ऊर्जेसह कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळून आले. त्यांनी २० ते ६० वयोगटातील निरोगी व्यक्तींवर हा अभ्यास केला. या संशोधनात या व्यक्तीच्या हृदयाची क्षमता वाढल्याचे आढळले.

या व्यक्तीच्या नंतर रक्तदाब, पल्सरेट, संतुलित झाल्याचे आढळले. तसेच टू डी इकोमधील इंजेक्शन फ्रॅक्शनदेखील सकारात्मक रित्या वाढल्याचे दिसल्याची माहिती पंडित जोशी यांनी दिली.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2023 : देखिली पंढरी देही, जनी, वनी..!

शे, दीडशे किलोमीटर विठ्ठल नामाचा जप करत जाणाऱ्या या वारकऱ्यांना पायी जाताना एवढी ऊर्जा येते कुठून या प्रश्नातून संशोधनाला सुरूवात झाली. त्यामुे हृदयरोग तज्ज्ञ डॉ अविनाश इनामदार आणि डॉ. संजीवनी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनातील व्यक्तींच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.