Asthma : महिलांनी असं मिळवा दम्यावर नियंत्रण; लिंगानुरुप लक्षणांनुसार दमा व्यवस्थापनाच्या टिप्स

छातीतील घरघर, खोकल्या व्यतिरिक्त दम्याचा महिलांवर काय परिणाम होतो?
asthama in women
asthama in womenSakal
Updated on

अस्थमा ही एक जुनी अशी श्वासाशी संबंधित समस्या असून जगभरांतील कोट्यावधी लोक या समस्येने त्रस्त आहेत. खरे पाहता वर्षाला भारतात ३४ दशलक्ष केसेस अस्थम्याच्या असतात आणि जगभरांतील १३ टक्के लोकांमध्ये हा आजार सापडतो. एकीकडे हे ही लोकांना माहिती आहे की, अस्थमा हा सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांना होत असला तरीही संशोधनातून असे दिसून आले आहे की, अस्थम्याचा महिलांवर पुरूषांपेक्षा वेगळा प्रभाव दिसून येतो. खरे पाहता मुलींवर किंवा महिलांमध्ये अस्थम्याचा अधिक परिणाम होत असतो, त्यांना अधिक प्रमाणात अटॅक येतो किंवा अधिक वेळा हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते.

महिलांमध्ये अस्थम्याची लक्षणे अधिक प्रमाणात का दिसून येतात ?

महिलांमध्ये अस्थम्याची अधिक लक्षणे दिसून येण्यामागे अनेक गोष्टी आहेत. एक महत्त्वाचे कारण म्हणजे आयुष्यभर महिलांच्या हॉर्मोन्स मध्ये होणारे बदल ही असू शकते. पौगंडावस्थेत, वयात आल्यानंतर, बाळंतपणात आणि रजोनिवृत्ती दरम्यान होणार्‍या हॉर्मोन्स मधील बदला मुळे फुप्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि अस्थम्याची लक्षणे अधिक तीव्र होतात.

asthama in women
Kidney Detox करण्यासाठी नियमित करा या फळांचं सेवन

उदाहरणार्थ, पाळीच्या काळात, एस्ट्रोजनचा स्तर कमी झाल्याने सूज येऊन अस्थम्याचा प्रभाव वाढतो. जवळजवळ २० ते २५ टक्के महिलांना त्यांच्या पाळीच्या सुरुवातीला अस्थम्याची तीव्र लक्षणे जसे छाती जड होणे, घरघरणे किंवा श्वास कमी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. बाळंतपणात दुसरीकडे प्रोजेस्टेरॉन अधिक प्रमाणात असल्यामुळे श्वासनलिका अकुंचन पावते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ‌ अस्थम्याच्या ३० टक्के महिलामध्ये गरोदरपणात अस्थम्याची अधिक तीव्र लक्षणे दिसून येतात पण रजोनिवृत्ती नंतर हा त्रास कमी होऊन अस्थमा वाढण्याचा धोका कमी होऊ लागतो.

हॉर्मोन्स मधील बदला बरोबरच, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकही यात मोठी भुमिका बजावतात, आणि महिलांमध्ये दम्याची लक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागतात, जसे स्वयंपाकघरातील जबाबदार्‍या जसे अन्न शिजवणे किंवा केर काढणे यांमुळे ही लक्षणे वाढतात. या सर्वांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना अस्थम्याचा अधिक प्रमाणात त्रास होतो. म्हणूनच महिलांमध्ये अस्थम्याचे व्यवस्थापन करतांना त्यांच्या साठी विशेष उपायांची गरज अधोरेखित होते.

asthama in women
Stomach Pain आणि अतिसाराचा त्रास होतोय, मग हे घरगुती उपाय करून पहा

महिला अस्थम्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करु शकतात?

अस्थम्याच्या लक्षणांचे योग्य व्यवस्थापन करतांनाचे पहिले पाऊल म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे. महिलांसाठी डॉक्टर हे अस्थम्याच्या व्यवस्थापनासाठी योग्य योजना तयार करतात यामध्ये नियमित तपासणी, औषधांचा वापर आणि अस्थम्यासाठी कृती योजनेचा समावेश असतो. इन हेलेशन थेरपी सुध्दा अस्थम्याच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक असतो विशेष करुन अशा महिलांसाठी ज्यांना अस्थमा अधिक प्रखरपणे असतो.

यामुळे सूज कमी होऊन फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे लक्षणांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते. परिणामकारक आणि सोप्या इनहेलेशन थेरपी मुळे अस्थम्यासारख्या आजारांवर योग्य परिणाम साधता आला आहे कारण त्यांच्यामुळे -

• औषधे थेट फुप्फुसात जातात त्यामुळे तोंडावाटे घ्यायच्या औषधांच्या तुलनेत अधिक लवकर आराम मिळतो.

• औषधाचा योग्य प्रमाणातील डोस हा थेट श्वासनलिकेत जातो जेणेकरुन कमी डोस लागतो व त्याच बरोबर तोंडावाटे घ्यायच्या औषधांच्या तुलनेत कमी साईड इफेक्ट्स दिसून येतात.

• डॉक्टरांनी दम्याच्या लक्षणांनुसार औषधे दिलेली असल्याने त्याचा नियमित उपयोग केल्यास अचानक उफाळून येणे किंवा अटॅकपासून मुक्ती मिळते.

• डॉक्टरांनी तपासणी करुन दिलेली औषधे असल्यामुळे सर्व वयोगटांसाठी योग्य प्रमाणात औषधे असतात. मुलांसाठी इनहेलर बरोबर स्पेसर डिव्हाईसही वापरण्याचा सल्ला दिला जातो.

त्याच बरोबर पीक फ्लो मीटर चा वापर करुन प्फुफूसाची क्षमता तपासली जाऊन अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. पीक फ्लो मीटर हे हातात धरुन वापरायचे छोटे यंत्र असून यामध्ये व्यक्ती किती जोरात हवा ही फुप्फूसातून वेगाने बाहेर काढू शकते ते तपासले जाते. यामुळे फुप्फूसाची क्षमता ओळखून श्वासनलिका किती मोकळी आहे ते ही कळते. पीक फ्लो चे मुल्य कमी असल्यास फुप्फूसाची क्षमता कमी असते.

अस्थम्यामुळे महिलांवर पुरुषांपेक्षा अधिक परिणाम होतांना दिसतो. आणि योग्य व्यवस्थापन योजना आखून लिंगानुरुप बदलांनुसार व्यवस्थापन करणे आवश्यक असते. प्रतिबंधात्मक उपाय जसे दम्याचा ॲटॅक येणारे घटक टाळणे आणि अन्य आरोग्य विषयक समस्यांवर इलाज केल्यास अस्थमा वाढण्याचा धोका कमी होऊ लागतो. अस्थमा व्यवस्थापनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास महिला सुध्दा अस्थम्या मुळे त्यांच्या जीवनावरील तीव्र समस्यांवर इलाज प्राप्त करु शकतात.

- डॉ. वृशाली खिरीद खडके, चेस्ट फिजिशियन, श्वास क्लिनिक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.