Asthma Symptoms : व्हायरल इन्फेक्शनने अस्थमा होऊ शकतो का?

अनुवांशिक अस्थमा या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते
Asthma Symptoms
Asthma Symptoms esakal
Updated on

Asthma Symptoms : दमा हा फुफ्फुसाच्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. ही एक दीर्घकालीन स्थिती आहे ज्यामुळे लहान मुलांना आणि प्रौढांना श्वास घेण्यास अडचण आल्यावर कधीही कोठेही अस्थमाचा जीवघेणा अटॅक येऊ शकतो.

दमा असलेल्या लोकांच्या श्वासनलिका अरुंद आणि सुजलेल्या असतात. ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. आणि श्वासोच्छवास घेण्यात अडथळे येतात. खोकला, श्वास घेताना घरघर येणे आणि दम लागणे ही दम्याची काही सामान्य लक्षणे आहेत. या रोगाचा जागतिक भार एकूण लोकसंख्येच्या 5-13% इतका आहे.

दिल्ली सीके बिर्ला हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिनचे सल्लागार डॉ. अशोक के. राजपूत यांनी अस्थमाबद्दल माहिती दिली आहे.

म्हणतात, “अस्थमाची नेमकी कारणे माहीत नसली तरी, असे दिसून आले आहे की व्हायरल इन्फेक्शन, तीव्र ब्राँकायटिसचा हिस्ट्री, पर्यावरणीय घटक आणि अनुवांशिक अस्थमा या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते.

Asthma Symptoms
World Asthma Day : धक्कादायक! दमा वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात 92 टक्के रुग्ण

तीव्र ब्राँकायटिसमुळे दम्याचा धोका वाढू शकतो का?

डॉ. राजपूत यांच्या मते, “ ब्राँकायटिस ही श्वसनासंबंधीची एक सामान्य स्थिती आहे ज्याचा परिणाम ब्रोन्कियल ट्यूब्सवर होतो.

हे ऍलर्जी, प्रदूषण आणि व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकते ज्यामुळे खोकला, छातीत अस्वस्थता आणि श्वास लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. यामुळे ब्राँकायटिसची पातळी वाढून या आजाराचा धोका अधिक वाढतो.

दमा कशामुळे होतो? (Asthma causes)

श्वसनमार्गात वारंवार जळजळ झाल्यामुळे दमा होऊ शकतो. ज्यामुळे दीर्घकालीन नुकसान होते. याव्यतिरिक्त, विषाणूजन्य संसर्गामुळे दम्याचा धोका वाढला आहे.

श्वसन विषाणूजन्य संसर्ग, जसे की सामान्य सर्दी किंवा फ्लूमुळे होणारे, श्वसनमार्गामध्ये दाहक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. ज्यामुळे दम्याची लक्षणे दिसून येतात. असा अंदाज आहे की 80% पर्यंत दम्याचा त्रास श्वसनाच्या विषाणूजन्य संसर्गाशी संबंधित आहे.

Asthma Symptoms
Workplace Asthma : ऑफीसमधला AC ठरू शकतो दम्याला कारणीभूत

दम्याचा धोका वाढवणारे घटक

“व्हायरल इन्फेक्शन्स आणि तीव्र ब्राँकायटिसमुळे दमा होण्याचा धोका वाढू शकतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, या परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या सर्व व्यक्तींना दमा होत नाही.

इतर घटक, जसे की वय, आनुवंशिकता आणि ऍलर्जी आणि प्रदूषकांचा पर्यावरणीय संपर्क देखील या स्थितीला चालना देण्यासाठी तितकेच जबाबदार आहेत,” डॉ. राजपूत म्हणतात.

अस्थमाची लक्षणे कोणती (Asthma symptoms in marathi)

  • खोकला, विशेषत: रात्री किंवा बोलत असताना, हसताना किंवा व्यायाम करताना

  • श्वासोच्छवासाचा त्रास,

  • बोलण्यात त्रास होणे,

  • सततच्या खोकल्यामुळे थकवा,

  • संसर्ग होण्याची शक्यता,

  • छातीच्या भागात वेदना आणि घट्टपणा,

  • श्वास बाहेर टाकताना घरघर येणे- मुलांमध्ये दम्याचे सामान्य लक्षण,

  • श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला येणे किंवा रात्री घरघर येणे यामुळे झोप येण्यास त्रास होणे,

  • व्हायरल इन्फेक्शन, सर्दी आणि सामान्य फ्लूमुळे खोकला किंवा घरघर अधिक वाढते.  

Asthma Symptoms
Asthma Disease : स्पायरोमीटरमुळे लवकर होणार दम्याचे निदान!

दम्याचा धोका टाळणे पूर्णपणे अशक्य असले तरी, जीवनशैलीच्या निवडी त्याची प्रगती मर्यादित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच योग्य स्वच्छता राखणे, व्हायरल इन्फेक्शन किंवा ब्राँकायटिससाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधे घ्यावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.