औरंगाबाद : वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण (Oxygen Refilling Through Environment) होण्यासाठी तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय करण्याची गरज आहे. गरज पुर्ण करण्यासाठी व धार्मिक महत्व आणि औषधी गुणधर्मांनीयुक्त तुळस (Sacred Basil) आणि चोविस तास ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ, वड (Banayan Tree), कडूनिंब (Neem) यासारखे वृक्ष ऑक्सिजनची गरज भागवु शकतील. यामुळे परदेशी झाडांच्या प्रेमात न पडता आपल्या भौगोलिक वातावरणात वाढणारी आणि मुबलक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे संगोपन, संवर्धन करण्याची वेळ आली आहे. विद्यमान परिस्थितीत जशी बाहेरून ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे तशी भविष्यात येऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि दिर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Babasaheb Ambedkar Marathwada University) पर्यावरण विभागाचे डॉ. बलभीम चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, तुळसीचे ही हवेचे शुद्धीकरण करणारे, ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. (Aurangabad Latest News For Natural Oxygen Plants Sacred Basil, Banayan Tree) याशिवाय तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहे.
यामुळे किमान प्रत्येक कुटूंबाने आपापाल्या घरापुढे किमान ७-८ तुळशीची रोपे लावली पाहिजेत यामुळे घरामध्ये शुद्ध हवा राहील आणि परिसरात पिंपळ, वड, कडू लिंब,आंबा अशी मोठया पानांची आणि आपल्या भौगोलिक वातावरणात वाढणारी झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही. लॉर्डस रिसर्च ॲण्ड लाईफ सायन्स लॅबरोटरीचे डॉ. डी. ए. सावंत म्हणाले, नासाच्या एका अहवालातील शिफारशीनुसार सहा इंचच्या कुंडीत१४ ते १५ मोठी तर ३० ते ३६ लहान वनस्पती लावल्या तर १८०० चौरस फुट जागेतील हवा शुद्ध ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जापनीज रॉयल फेर्न ही वनस्पती केवळ ऑक्सिजनच देत नाही तर त्याबरोबरच वातावरणातील फॉर्मलडिहाईड नावाचा विषारी वायूदेखील शोषून घेत असते. केमीकल कंपन्या, एमआयडीसीतुन मोठ्या प्रमाणात हा वायू निघत असतो त्यामुळे अशा भागात या वनस्पतीची लागवड केली पाहिजे. बोस्टन फर्न ही वनस्पती ऑक्सिजन देते तसेच वातावरणात आर्द्रता सोडून हवेतील गारवा वाढवण्याचे काम करते तसेच वातावरणातील बेन्झीन वायू शोषून घेते. जर्बेरा हे फुलझाड संध्याकाळच्यावेळी जास्त ऑक्सिजन सोडते. वातावरणातील बेन्झीन शोषून घेते.ऑक्सिजन पातळी वाढवत असल्याने जर्बेराचे झाड बेडरूममध्ये किंवा बेडरूमबाहेर लावावे. याशिवाय हवेचे शुद्धीकरण करणारी वनस्पती म्हणुन हायली इफिशिअन्ट एअर प्युरीफायर म्हणुन उपयोग रोपांमध्ये स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट, हार्टलिफ, चायनीज इव्हरग्रीन, मनी प्लांट, लिली, तुळशीची रोपेही लावणे अत्यंत गरजेचे आहे.
चोवीस तास ऑक्सिजन देणारा पिंपळ
मोठ्या पानांची आपल्या भौगोलिक वातावरणात वाढणारी पुर्वीची मोठी झाडे कमी झाली आहेत. झाडे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड हा दुषित वायू शोषून घेऊन ऑक्सिजनचे फेरभरण करून तो वातावरणात पुन्हा सोडून देतात. डॉ. चव्हाण यांनी सांगीतले, झाडे दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात मात्र जगात पिंपळ एकमेव वृक्ष आहे जो २४ तास या दोन्ही प्रक्रिया करत असतो. पिंपळ वृक्ष १०० टक्के ऑक्सिजन देत असतो, कडूलिंब कार्बनडाय ऑक्साईड शोषून ७५ टक्के ऑक्सिजन देत असतो. वड ८० टक्के ऑक्सिजन देत असतो.
ऑक्सिजन देणारी रोपे द्या भेट
कोणत्याही कार्यक्रमामध्ये रोपे भेट दिली जातात.संक्रांतीला महिला वाण देतात अशा प्रसंग जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची रोपे द्यावी घ्यावी. तुळशीला धार्मिक महत्व दिले जाते , पुजा केली जाते. तुळशीचे शाम (कृष्ण) तुळस, रान तुळस, हरिद्वार तुळस, घोड तुळस, चौकोनी तुळस, वैजयंती तुळस अशा २१प्रजाती आहेत. यांच्या पानात, काड्यात औषधी गुणधर्मही मुबलक आहेत. यामुळे जमेल तितकी तुळशीची रोपे भेट दिली पाहीजेत. घराच्या परिसरात वाढवली पाहिजेत असे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.