आहार‘मूल्य’ : आहारातील वेगळ्या भाज्या

बहुतांश तरुण मंडळींमध्ये भाज्या खाण्याविषयी कंटाळा असतो. दुधी भोपळा, घोसावळे, दोडका इत्यादी भाज्यांविषयी तर एक प्रकारचा विरोधच दिसतो. आज आपण अशाच वेगळ्या भाज्यांविषयी माहिती घेऊ या.
Vegetable
Vegetablesakal
Updated on

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

बहुतांश तरुण मंडळींमध्ये भाज्या खाण्याविषयी कंटाळा असतो. दुधी भोपळा, घोसावळे, दोडका इत्यादी भाज्यांविषयी तर एक प्रकारचा विरोधच दिसतो. आज आपण अशाच वेगळ्या भाज्यांविषयी माहिती घेऊ या.

पडवळ : या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात चोथा मिळतो. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उष्मांक कमी असतात. मलावरोध कमी करण्यासाठी उपयुक्त. पोट भरल्याची भावना वाढण्यास मदतरूप. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त.

दुधी भोपळा : उत्तम चोथा व पाणीयुक्त. अ, क, जीवनसत्त्व, लोह, झिंक, पोटॅशियमयुक्त भाजी. उष्मांक कमी. पचनक्रिया सुधारण्यास मदतरूप. कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून, भाजी करून, सूप करून त्याचे सेवन करावे. रक्तातील शर्करा संतुलित राखण्यास मदतरूप.

घोसावळे : फायबरचे प्रमाण जास्त. पचनक्रिया सुधारते. मलावरोध कमी करण्यास मदतरूप. त्वचा व हाडांसाठी उपयुक्त. उष्मांकाचे प्रमाण कमी.

दोडका : भरपूर प्रमाणात चोथा. उष्मांक कमी. झिंक, पोटॅशियम, क्षारयुक्त. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदतरूप. मलावरोध कमी करते. रक्तातील शर्करा संतुलित राहण्यास मदतरूप.

तोंडले : चयापचयाची क्रिया सुधारण्यासाठी मदतरूप. हदयाचे आरोग्य सुधारण्यास मदतरूप. चोथा व पाणीयुक्त भाजी. बद्धकोष्ठता, आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदतरूप.

कारले : कडू चवीचे कारले पचनाची क्रिया सुधारते. रोगप्रतिबंधकशक्ती वाढवण्यास मदतरूप. आतड्यांचे आरोग्य नियंत्रित करते. चोथा व कमी उष्मांकयुक्त भाजी. रक्तातील शर्करेचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदतरूप.

कोहळा : कोहळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व उष्मांक कमी असतात. जीवनसत्त्व क; बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, झिंक, तांबे, सेलेनियम क्षारयुक्त, फायबरयुक्त. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त. पचनशक्ती वाढवून मलावरोध कमी करते. रक्तदाब व रक्तातील साखर नियंत्रीत करण्यासाठी उपयुक्त.

या भाज्यांचे आहारात सेवन करताना...

  • सालासकट वापर करावा.

  • वाफवून, उकडून, ब्रॉथ बनवून भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये वापरावे.

  • वाफवून रायता, कोशिंबिरीच्या रूपात खावे.

  • कच्चे खाण्याचे टाळावे.

  • प्रथिनांची जोड म्हणून त्या भाज्यांमध्ये वेगवेगळ्या डाळी, कडधान्ये, बेसन/ मूग डाळीच्या पिठाचा वापर करावा.

  • सूप, कढण स्वरूपात घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.