Avocado Benefits : विदेशी ॲव्होकॅडो फळ मधुमेह अन् हृदयासाठी प्रभावी, जाणून घ्या फायदे

Avocado Benefits : किमतीने महाग पण कर्करोग, मधुमेह, वजन कमी करण्यासाठी हितकारक आहे ॲव्होकॅडो.
Avocado Benefits
Avocado Benefitsesakal
Updated on

Avocado Benefits : कर्करोग, मधुमेह, वजन कमी करण्यासाठी विदेशी ॲव्होकॅडो फळ खाणे चांगले आहे. फळ महाग आहे, तरीही खरेदीदारांची संख्या बरीच आहे. २०० ते २५० ग्रॅमचे हे एक फळ २०० ते २५० रुपयांना मिळते. दक्षिण मध्य मेक्सिकोमध्ये स्थित पुएब्ला ही ॲव्होकॅडोची मातृभूमी आहे. जिथे हे स्वादिष्ट फळ प्रथम विकसित झाले.

शहरात मोजक्याच फळ विक्रेत्यांकडे ॲव्होकॅडो हे महागडे फळ मिळते. चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण फळाची किंमत काय, किती महाग आहे हे न पाहता मोठ्या आवडीने खातात. विदेशी फळ असल्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे. फळाचे वजन कमी आणि किंमत जास्त त्यामुळेही सर्वसामान्य ग्राहक खूप विचार करून ते खरेदी करतात.

पण मधुमेह असणाऱ्यांसाठी ॲव्होकॅडो हे फळ चांगले आहे. ॲव्होकॅडोच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळतो आणि आरोग्य बिघडत नाही.

हृदयासाठी फायदेशीर

ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर, पोटॅशियम हे घटक असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ॲव्होकॅडोमध्ये अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असतात. हेल्दी फॅट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. ॲव्होकॅडोमध्ये हे दोन्ही घटक असतात त्यामुळे ॲव्होकॅडो हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.

ॲव्होकॅडोमध्ये खनिजांचे प्रमाण जास्त आहे. इतर आजार होण्यापासून बचाव करतात. हे फळ खाण्यासाठी चांगले आहे. फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे क, अ, ई, हे तिन्ही घटक चांगल्या प्रमाणात असल्यामुळे फायदेशीर ठरतात.

— डॉ. अल्का कर्णिक, आहारतज्ज्ञ

विदेशी फळ असल्यामुळे महाग आहे. त्याचे ग्राहक कमी आहेत. महाग असल्यामुळे तसेच बाहेरून हे फळ ऑर्डरनुसार आम्ही मागवतो. शनिवार, मंगळवार हे दोन दिवसचं हा माल ऑर्डरनंतर आम्हाला मिळतो. २०० ते २५० रुपयाला एका फळाची किंमत आहे.

— सय्यद अकबरअली, फळविक्रेता.

त्वचेसाठी उपयुक्त फळ

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ॲव्होकॅडो खाऊ शकता. या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे साहजिकच तुम्ही जास्त खाणे टाळता आणि मग हळूहळू वजन कमी होते. त्वचा चांगली व्हावी यासाठी ॲव्होकॅडो खावं.

व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी हे त्वचा चांगले ठेवतेय याने त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. हे दोन्ही व्हिटॅमिन ॲव्होकॅडो मध्ये आढळतात. ॲव्होकॅडोमध्ये असणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. कॅन्सरसारख्या आजाराशी लढायचे असेल तर ॲव्होकॅडोचे सेवन करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.