Bone Health: Old Age मध्ये हाडं मजबूत हवी असतील तर तरुणपणात नका खाऊ हे पदार्थ....

तरुण असताना योग्य आहार Diet घेणं गरजेचं आहे. योग्य आहार न घेतल्यास ३० वर्षांनंतर हाड Bones ठिसूळ होवू लागतात
Bone Health Tips
Bone Health Tips Esakal
Updated on

Bone Health Tips : आपल्या शरीराचं वजन हे आपल्या हाडांवर असतं. त्यामुळेच हाडं मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतं. जन्मानंतर २० वर्षापर्यत हाडांचा संपूर्ण विकास होतो. त्यानंतर हाडांचा विकास हा अत्यंत कमी गतीने होत असतो. तर ३० वर्षांनंतर तर तो पूर्णपणे थांबतो.

जितकी हाडं मजबूत असतील तितकाच वृद्धापकाळात हाडांच्या समस्या कमी जाणवतील आणि आपण तंदूरुस्त राहू. Avoid eating harmful things in youth to keep bones fit in old age

यासाठीच तरुण असताना योग्य आहार Diet घेणं गरजेचं आहे. योग्य आहार न घेतल्यास ३० वर्षांनंतर हाडं Bones ठिसूळ होवू लागतात. तसंच ऑस्टियोपोरोसिस, हाडांचा कॅन्सर, हाडांमध्ये इंफेक्शन अशा समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. Worst Food for bone health

हाडं मजबूत राहण्यासाठी तसंच हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम. प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी Vitamin यांची गरज असते. ही सर्व पोषक तत्व आपल्याला चांगल्या आहारातून मिळत असतात. मात्र अलीकडच्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे ही पोषक तत्व शरीराला कमी प्रमाणात मिळत असल्याने हाडांचं स्वास्थ्य बिघडू लागलं आहे.

कमी वयातच हाडं ठिसूळ होवू लागल्याने अनेक इतर समस्या उद्भवू लागल्या आहेत. कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे हाड्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे देखिल वाचा-

Bone Health Tips
Bone Health : हाड मजबूत करण्यासाठी खा या तीन वस्तू

खारट पदार्थ टाळणे- २०१६ सालामध्ये एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये छापलेल्या एका शोधानुसार चीनमध्ये जे लोक मिठाचं जास्त सेवन करत होते त्यांच्यामध्ये ऑस्टियोपोरोसिस आजारा वाढण्याचा धोका वाढल्याचं लक्षात आलं. या आजारामध्ये हाडं पातळ आणि निर्जिव होवू लागतात.

तसंच खारट पदार्थ खाल्ल्याने त्यातील कॅल्शियम कमी होवू लागतं. ब्रेड रोल, पिझ्झा, सॅण्डवीच, सूप. चीज, पॉपकॉर्न, चीप्स, तसचं फरसाण, अंड आणि ऑमलेट या मीठाचं प्रमाण जास्त असतं. या पदार्थांच्या अधिक सेवनामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होवू शकतं. Avoid food for strong bones

जास्त गोड खाणे- पबमेड सेंट्रलच्या अभ्यासानुसार साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश झाल्यास कॅल्शियम. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम लघवीवाटे बाहेर पडतं.

तसचं कॅल्शियम शोषून घेण्यास यामुळे अडचणी निर्माण होतात. चॉकलेट. पेस्ट्री, केक, प्रोसेस्ट फूड तसचं सॉस आणि मिठाई या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करावं. यामुळे हाडांवर परिणाम तर होतोच शिवाय मधुमेह होण्यासाठी देखील हे एक कारण ठरू शकतं.

सोडा आणि कॅफेन- २०१४ सालामध्ये द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधानुसार सोड्याचं सेवन करणाऱ्या ७३ हजार महिलांमध्ये हिर फ्रॅक्चरची समस्या वाढल्याचं निदर्शनास आलं. सोडा तसचं कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असतं. एका अभ्यासानुसार शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढल्यास हाडांची घनता कमी होते. किंवा हाडं ठिसूळ होतात.

अल्कोहोल- दारुचं सेवन हे कधीही शरिरास हानीकारकच आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अर्थराइटिस अँड मस्कुलोस्केलटनच्या अभ्यासानुसार दारु किंवा अल्कोहलमुळे शरिरात विटामिन डी आणि कॅल्शियम शोषून घेण्यात अडथळा निर्माण होतो. 

हे देखिल वाचा-

Bone Health Tips
Bone Health : या सवयींमुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात

अलिकडे बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष केलं जात. तरुणांमध्ये जंक फूड खास करून पिझ्झा, पेस्ट्री, केक, सोडा तसचं प्रोसेस्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. ज्या वयात हाडं मजबूत होत असतात. त्याच वयात चुकीचे अन्न पदार्थ खाल्ले गेल्याने त्याचा परिणाम भविष्य काळात भोगावा लागू शकतो.

यामुळे लवकरच हाडांचे आजार होण्याची शक्यता बळावते. म्हणूनच २० ते ३० या वयोगटातील व्यक्तींना हाडांच्या मजबूतीसाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहेत. यात अर्थातच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दही, तूप, पनीर याचं सेवन करावं.

Food for strong bones. तसचं सोयाबिन आणि नाचणी हे देखील हाडांच्या मजबुतीसाठी पोषक आहार आहे. या जोडीला पुरेसा सुर्यप्रकाशातील वावर आणि व्यायामाची जोड हाडं मजबूत ठेवण्यास मदत करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.