Ayurvedic Health Tips
Ayurvedic Health Tipsesakal

Ayurvedic Health Tips : ऑक्टोबर महिन्यात हे आयुर्वेदीक पदार्थ खा, तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीत

चला तर बदलत्या ऋतूमध्ये निरोगी आरोग्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइल कशी असावी ते जाणून घेऊया
Published on

Ayurvedic Health Tips : वातावरण बदललं की अनेकजण आजारी पडतात. अशात आयुर्वेदातील काही गाइडलाइन्सनुसार थंडीच्या दिवसांत आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत सांगितले आहे. चला तर बदलत्या ऋतूमध्ये निरोगी आरोग्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइल कशी असावी ते जाणून घेऊया.

तूप आणि नारळाच्या तेलाचे सेवन करा

तुमच्या खाद्यपदार्थांत तूप आणि नारळाच्या तेलाचा वापर करा. जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील.

चहामध्ये दालचिनीचा वापर करा

बदलत्या ऋतूत तुमचे हातपाय थंड पडत असेल तर चहा बनवताना त्यात लहानसा दालचिनीचा तुकडा घाला. त्यात demulcent नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे कफ आणि गळ्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

Ayurvedic Health Tips
OTT Releases In October 2023: ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये जायची गरजच नाही! ओटीटीवर होणार मोठा धमाका

खाण्यात मसालेदार पदार्थांचा उपयोग करा

मीठ, आलं, वेलदोडे, दालचिनी, लवंग, काळे मीरे, लसूण, कांदा आणि जीरे यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा जेवण बनवताना वापर करा. ज्यामुळे जड जेवणही सहज पचण्यास मदत होते.

गरम जेवण करा

थंड सलाड खाण्याऐवजी गरमागरम सूप प्या. अंडी, तूप, दूध, भाज्या, नट्स आणि यांसारखे पदार्थ सुरक्षात्मक, इन्सुलेट फॅटची लेयर तयार करण्यास मदत करते.

Ayurvedic Health Tips
Health Tips: आरोग्याच्या समस्या झटक्यात होतील दूर म्हणून Weight Loss आहे गरजेचा...

काळ्या मिऱ्यांचा वापर आवर्जून करा

काळे मीरे वातनाशक मसाल्याचा पदार्थ आहे. सर्दी किंवा पचनशक्ती सुधारण्यासाठी याची मदत होते. सकाळच्या चहामध्ये चालचिनीसह तुम्ही काळे मिरेसुद्धा घालू शकता. या ऋतूत काळे मिरे, हळद किंवा दालचिनी यांसारखे मसाले आरोग्यदायी मानले जातात. (Health News) चांगली झोप यावी यासाठी दुधात जायफळ घाला.

या ऋतूत चांगली झोप यावी यासाठी एका ग्लास दुधात एक चिमूट जायफळ घाला. ज्यामुळे झोपेच्या समस्या दूर होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()