Ayurvedic Remedies For Stress : जीवघेण्या आजारांचं कारण स्ट्रेस, या 7 आयुर्वेदिक उपायांनी असा करा दूर

काही आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तणाव दूर केला जाऊ शकतो
Ayurvedic Remedies For Stress
Ayurvedic Remedies For Stress esakal
Updated on

Ayurvedic Remedies For Stress : आजच्या धावपळीच्या जगात तणाव ही एक सामान्य समस्या आहे आणि बरेच लोक त्यांच्या तणावाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांकडे वळत आहेत. आयुर्वेद ही एक प्राचीन भारतीय औषध प्रणाली आहे जी संपूर्ण आरोग्य आणि निरोगीपणाला चालना देण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करते.

काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती, तेल तणाव कमी करण्यास आणि ध्यान, प्राणायाम आणि योगासने आराम तुम्हाला रिलीफ देऊ शकतात. ते शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळे तणावाचा सामना करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय वापरणे खूप फायदेशीर आहे. चला काही आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तणाव दूर केला जाऊ शकतो.

अश्वगंधा

ही औषधी वनस्पती तणाव कमी करण्यास मदत करते. अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण बनवून गरम पाण्यासोबत सेवन करता येते.

ब्राह्मी

ब्राह्मी मन शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. ब्राह्मी चहा बनवून पिऊ शकतो.

जटामांसी

जटामांसी शांती आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची पावडर बनवून गरम पाण्यासोबत सेवन करता येते.

Ayurvedic Remedies For Stress
Exam Stress Management : मानसोपचारतज्‍ज्ञांचा सल्‍ला; बिंदास्‍त होऊन परीक्षेला जा सामोरे..!

योग आणि प्राणायाम

योग आणि प्राणायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. योगामध्ये विविध आसनांचा समावेश होतो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. प्राणायामामुळे मानसिक शांती लाभते.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल शरीरावरील ताण कमी करण्यास मदत करते. नाभीवर लावून मसाज करता येतो.

तुळस

तुळशीमुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. तुळशीचा चहा बनवून पिऊ शकता. (Yoga)

Ayurvedic Remedies For Stress
Stress Management : ताण-तणावाचे करा व्यवस्थापन; मानसिक विकारांपासून होईल रक्षण

तणाव वाढल्याने बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवतात. तेव्हा तुमचा स्ट्रेस फ्री राहाण्याचा कायम प्रयत्न करत राहावा. तसेच तुम्हाला अतिस्ट्रेस आल्यास मन अशा गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा ज्यात तुम्हाला आनंद मिळतो. त्याने तुम्हाला बरे वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.