cough cold ayurvedic upay Ayurvedic Tea
cough cold ayurvedic upay Ayurvedic TeaEsakal

Cough Cold Home Remedy: ताप, सर्दी आणि खोकल्यासाठी या Ayurvedic Tea चे करा सेवन, मिळेल आराम

cough cold ayurvedic upay: आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदीक चहाचे पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल. शिवाय इतर समस्याही दूर होतील.
Published on

Cough Cold Home Remedy: निसर्गाच्या लहरी स्वभावाच्या माणासाच्या आरोग्यावरही Health विपरीत परिणाम होत असतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात Summer काही वेळा अचानक आभाळ येत आणि पावसाच्या सरी कोसळू लागतात. Ayurvedic Tea will help to cure Cough and Cold Marathi Tips for Health

कधी गरम, कधी थंड तर कधी दमट अशा सतत बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी डोकं वर काढू लागतात. खास करून बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला Cough and Cold , घशाला इंफेक्शन आणि ताप अशा समस्या निर्माण होतात.

अनेकदा बदलत्या वातावरणामुळे ताप आल्याने थकवा Fatigue आणि अशक्तपणा जाणवतो. काही वेळेला हा ताप ३-४ दिवसांहून अधिक काळ राहतो. यामुळे अंगातील संपूर्ण शक्ती कमी होते.

अशावेळी डॉक्टरांच्या औषधांसोबतच काही घरगुची उपाय केल्यास तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो. तापामध्ये जर तुम्ही काही आयुर्वेदिक चहाचं सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून लवकर बरं होण्यास मदत होईल.

आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदीक चहाचे पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल. शिवाय इतर समस्याही दूर होतील.

गुलाब, धणे आणि कडीपत्ता चहा- हा चहा तयार करण्यासाठी २ ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये तापत ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका.

त्यानंतर त्यात एक चमचा धणे खलबत्यामध्ये कुटून टाका. तसचं कडीपत्त्याची ८-१० पानं क्रश करून टाका. आता हे पाणी १०-१५ मिनिटं उकळू द्या. पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा.

हा चहा कोमट झाल्यानंतर गाळून त्याचं सेवन करा. या चहामधील गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तापातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. तर धण्यामुळे देखील शरीराला थंडावा मिळतो आणि इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

cough cold ayurvedic upay Ayurvedic Tea
Green Tea : ग्रीन टी पित असाल तर आत्ताच थांबा ! असा आहे धोका

तुळशीचा चहा – तुळशीचा चहा हा आरोग्यासाठी लाभदायक आहे. तुळशीच्या पानातील जीवाणूनाशक, जंतूनाशक, प्रतिजैविकं आणि बुरशीनाशक गुणधर्म विषाणूजन्य तापाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यासाठी जवळपास १०-१५ तुळशीची पानं पाण्यामध्ये चांगली उकळून याचं सेवन तुम्ही करू शकता.

तुळशीच्या चहाच्या सेवनामुळे तापासोबतच डोकेदुखी, सर्दी, खोकला आणि घसादुखीच्या समस्येतून लवकर आराम मिळेल.

आलं मधाचा चहा- आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आल्याचा वापर प्रभावी मानला जातो. आल्याच्या दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि वेदनाशामक गुणधर्मांमुळे तापामध्ये आराम मिळण्यासाठी आणि विषाणूजन्य तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत होते. मधातील जीवाणुरोधी गुणामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.

हा चहा तयार करण्यासाठी एक चमचा किसलेलं आलं साधारण दीड कप पाण्यामध्ये ४-५ मिनिटं उकळून घ्यावं. त्यानंतर हे पाणी गाळून त्यात चमचाभर मध मिसळावं. व्हायरल फिव्हरमध्ये दिवसातून दोन वेळेस या चहाचं सेवन केल्यास फरक जाणवेल.

दालचिनी चहा- दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तसचं दालचिनीच्या चहाच्या सेवनामुळे सर्दी कमी होऊन घशालाही आराम मिळतो. तुम्ही तुमच्या रोजच्या चहामध्येही दालचिनी पावडर टाकू चहाचं सेवन करू शकता.

दालचिनी चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाकून १-२ मिनिटं उकळू द्यावं. त्यानंतर यात एक चमचा मध टाकून चहाचं सेवन करा.

जास्वंदीच्या फुलांचा चहा- जास्वंदीच्या फुलाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. या फुलांच्या चहाच्या सेवनामुळे ताप कमी होवून वेदना कमी होण्यास मदत होते.

जास्वंदीच्या फुलांमध्ये ताप कमी करणारे गुणधर्म आढळतात. याशिवाय यात या फुलामध्ये अँटीव्हायरल आणि अँटी-एनाल्जेसिक गुणधर्म देखील आहेत.

तापामध्ये पाण्यामध्ये जास्वंदीची फूलं उकळून या चहाचं तुम्ही दिवसातून दोनदा सेवन करू शकता. तसचं जास्वंदीचं फूल शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतात.

या फूलाचं शितल पेय प्यायल्याने आराम मिळू शकतो. यासाठी काही जास्वंदीची फूल पाण्यामध्ये टाकून ठेवा. दिवसभर हे पाणी थोडं थोडं पित रहा यामुळे आराम मिळेल.

हे देखिल वाचा-

cough cold ayurvedic upay Ayurvedic Tea
Iced Tea : उन्हाळ्यात घ्या वेगवेगळ्या आइस टीची मज्जा, घरीचं बनवा हे पेय...

पिप्पली- पिप्पली ही एक औषधी वनस्पती आहे जी सामान्यतः तापाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. यातील अंटी इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी व्हायरल गुण तापाची लक्षण कमी करण्यास मदत करतात. यामुळे तापामध्ये पिप्पलीच्या चहाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

अशा प्रकारे तापामध्ये जर तुम्ही काही आयुर्वेदिक चहाचं सेवन केलं तर लवकर आराम मिळण्यास तसचं अशक्तपणा दूर होण्यास मदत होवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()