Ayurvedic Tips : पावसाळ्यात दूध पिल्याने त्रास होतो? आयुर्वेदानुसार योग्य पद्धत जाणून घ्या

जर्नल ऑफ इन्फेक्शन अँड इम्युनिटीनुसार, पावसाळ्यात विविध कारणांमुळे माणसाची प्रतिकारशक्ती प्रभावित होते.
Ayurvedic Tips
Ayurvedic Tips esakal
Updated on

Ayurvedic Tips : पावसाळा सुरू होताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या ऋतूमध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याच ऋतूत कावीळ, टायफाइड, जुलाब यांसारखे आजार पचनाच्या समस्यांमुळे उद्भवतात. जर्नल ऑफ इन्फेक्शन अँड इम्युनिटीनुसार, पावसाळ्यात विविध कारणांमुळे माणसाची प्रतिकारशक्ती प्रभावित होते.

वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे हानिकारक जीवाणू, विषाणू आणि बुरशी सहज विकसित होऊ लागते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी माणसाने आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात खाण्यापिण्याचे काही नियम पाळल्यास माणूस निरोगी राहू शकतो. असाच एक नियम दुधाबाबतही आहे. होय, पावसाळ्यात दूध पिताना योग्य वेळ आणि पद्धत अवलंबली पाहिजे. पावसाळ्यात दूध पचण्यास जड जातं. तेव्हा दूध पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Ayurvedic Tips
Milk Price: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रूपयांचा किमान भाव

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दूध कसे प्यावे?

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात नेहमी गरम दूध प्यायला हवे. कोमट दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण वाढते. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

दूध पिण्याची योग्य वेळ

आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी न्याहारीच्या वेळी दुधाचे सेवन केले पाहिजे.

आयुर्वेदानुसार दूध पिताना या चुका करू नका.

पावसाळ्यात कधीही थंड दूध पिऊ नये.

जड जेवणासोबत दूध घेऊ नये. असे केल्याने दूध नीट पचत नाही.

दुधात मीठ, तृणधान्ये आणि फळे घेऊ नयेत.

दूध उकळल्याशिवाय पिऊ नये. (Health)

Ayurvedic Tips
Yawning & Health : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल; वेळीच ओळखा हे आजार

पावसाळ्यात या गोष्टी दुधात टाकून प्या.

पावसाळ्यात दूध हेल्दी आणि चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, दालचिनी, हळद किंवा आले मिसळून ते पिऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.