Baby Health : थांबा! चुकूनही बाळाच्या खोलीत लॅपटॉप वापरून त्याच्या आरोग्याशी खेळू नका

घरात लहान बाळ असेल तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते
Baby Health
Baby Health esakal
Updated on

Baby Health : घरात लहान बाळ असेल तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते, आपल्या आजी म्हणायच्या तसं अगदी डोळ्यात तेल घालून बाळाकडे लक्ष ठेवावं लागतं, लहान बाळाजवळ कोणतेही इलेक्ट्रिक डिवाईस नसावे हे आपल्याला माहिती आहे पण त्या खोलितही आपण ते डिवाईस वापरू नये असा सल्ला दिला जातो, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Baby Health
Baby Boy Name & Meaning : मुलांची हटके नावं अर्थासहित

जेव्हा एखाद्या घरात बाळाचा जन्म होतो, तेव्हा त्याच्या आई वडिलांसोबत पूर्ण कुटुंब त्याच्या संगोपन आणि काळजीबद्दल खूप जागरूक असते. बाळाला काय खायला द्याव, काय कराव, काय करू नय, कस ठेवाव, सगळंच.

Baby Health
Baby Name : मुलीसाठी ट्रेंडिंग नावांचं ऑप्शन बघा

बाळाच्या खोलीतही विशेष काळजी घेतली जाते जसे की बाहेरून जास्त थंड हवा येऊ नये, खोली खूप गरम नसावी आणि बाळाच्या खोलीत आणि आजूबाजूला जास्त आवाज नसावा. त्याचप्रमाणे पालकांनाही मुलांच्या खोलीत गॅजेट्स वापरण्याची चिंता असते. काही पालकांना प्रश्न पडतो की त्यांनी बाळाच्या खोलीत किंवा मुलाच्या आसपास लॅपटॉपवर काम करावे की नाही?

Baby Health
Baby On Board: गरोदरपणाची धमाल जर्नी.. 'बेबी ऑन बोर्ड'चा प्रवास सुरु..

काय सुरक्षित आहे

सामान्यतः असे म्हटले जाते की लॅपटॉप मुलाच्या खोलीत किंवा जेथे मूल झोपले आहे तेथे वापरला जाऊ शकतो. मात्र, सध्या लॅपटॉप, टॅब्लेट, फोन किंवा वायफायमधून येणारे घातक किरण मुलासाठी हानिकारक असल्याचा कोणताही पुरावा अजून नाही. पण काहींचे म्हणणे आहे की हे घातक आहे. याबाबत अजून संशोधन सुरू आहे.

Baby Health
Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळे

आपण काय करू शकतो

संशोधन होईल तेव्हा होईल.. आत्ता आपण काय करू शकतो तर,

१. तुमच्या बाळाच्या खोलीत घरातल्या इंटरनेटचे राउटर नसावे.

२. तुम्ही काम करत असाल, लॅपटॉप किंवा मोबाईल हाताळत असाल तर तुमच्या आणि तुमच्या बाळात जरा अंतर ठेवा.

३. जर तुमचं काम झालं आहे तर लॅपटॉप बंद करून ठेवून द्या.

४. तुमच्या मोबाईल वर अलार्म सेट करणं बंद करा त्याऐवजी गजर होणारं घड्याळ तुमच्या बेड च्या साईड टेबलवर ठेवा.

Baby Health
Baby Names : कधीही जुनी न होणारी लहान मुला-मुलींची नावं

बालरोगतज्ञ काय म्हणतात

बालरोगतज्ञ म्हणतात, लॅपटॉप आणि टॅब्लेट स्क्रीन वर निळा प्रकाश निर्माण करतात, ज्यामुळे तुमच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपल्याला झोपण्यासाठी मदत करणारा एक स्त्राव म्हणजे मेलाटोनीन, या प्रकाशाच्या किरणांमुळे या स्त्रावात व्यत्यय येतो आणि झोप खराब होते किंवा लागतच नाही. त्यामुळे मुलाच्या बेडवर लॅपटॉप ठेवू नका.

Baby Health
Tips for Baby : असा करा लहान मुलांचा सर्दी-खोकल्यापासून बचाव

काय करायचं

मोबाईल किंवा लॅपटॉप यांसारखी उपकरणे विशेषत: झोप येण्यात व्यत्यय आणू शकतात आणि शांत झोपेमध्ये अडथळा आणू शकतात. त्यामुळे, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला शांतपणे झोपायचे असेल, तर त्याच्या खोलीत कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.