Back Pain In Winter: हिवाळ्यात अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, चुकीच्या सवयी आणि शारिरीक हालचालींचा अभाव होय. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसूण राहणे, रोज व्यायाम न करणे, पौष्टिक पदार्थांचा अभाव, जंकफूडचे सेवन, वाढत्या वजनामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो. जडवस्तू किंवा खाली पडलेल्या वस्तू उचलताना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखी ही सामान्य समस्या असली तरी रोजच्या काही सवयी बदलून आणि नियमित व्यायाम करून आराम मिळू शकते.