Back Pain Remedies: शहरातील खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यामुळे पाठीच्या कण्यावर सर्वाधिक परिणाम होतो. ज्यांना फ्रोझन शोल्डर, सांधेदुखीसारखे विकार आहेत, अशांना हा त्रास अधिक होतो. दुचाकी चालवण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांचा हा विकार बळावतो.
नसांवर दाब येऊन स्नायू आखडून आणखी त्रास होतो. औषधे घेऊन व्यायाम करूनही उपयोग होत नाही. खराब रस्त्यांवर खड्ड्यांमधून हेल्मेट घालून गेल्यास त्या वजनामुळे आणखी त्रास होतो. पाणी साठलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने किंवा गतिरोधक लक्षात न आल्यामुळे बसणाऱ्या हादऱ्याचेही शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात.