Bad Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे ही एक गंभीर समस्या आहे. याला सायलेंट किलर म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास सुरुवातीची लक्षणे सहसा कळत नाही. मात्र तेव्हापर्यंत रक्तवाहिन्या ब्लॉक झालेल्या असतात आणि हार्ट अटॅकचा धोकासुद्धा वाढलेला असतो. कोलेस्ट्रॉल तुम्ही खाल्लेल्या फॅटयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वाढतो.
शरीराच्या योग्य प्रोसेससाठी कोलेस्ट्रॉल आवश्यकच आहे मात्र शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग, हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे आणि आयुष्यभर औषधे खायची नसेल तर तुम्ही हे उपाय आवर्जून करायला हवे.
कडुलिंबाची पाने अँटिऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि लिपिड रेग्युलेटिंग गुणधर्मांसाठी ओळखली जातात. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासाठी कडुनिंबाच्या पानांची साल सुकवून त्याची पावडर बनवावी. नंतर ही पावडर पाण्यात टाकून उकळा. हा काढा दिवसातून 2-3 वेळा प्या.
तुळशीची पानं हा आयुर्वेदातील शक्तिशाली उपाय आहे. ही पानं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. तुळशीच्या पानांत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे गुणधर्म असतात. यासाठी तुळशीची पानं धुवून सुकवा आणि त्याचा चहाच्या रूपात वापर करा. पाणी उकळून त्यात तुळशीची पानं घाला. आता हा चहा तुम्ही रोज करून पिऊ शकता. (Health)
जांभळाची पानं कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यसाठीचा चांगला उपाय आहे. यात अँथोसियानिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यासाठी ताजी जांभळाची पानं सुकवून त्याचे पावडर बनवून घ्या. त्यानंतर हे पावडर पाण्यात उकळून प्या. हा एकप्रकारचा काढाच आहे. तुम्ही दिवसातून २-३ वेळा पिऊ शकता. (Cholesterol)
मेथीची पानं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यात फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही ताज्या मेथीच्या पानांची कोशिंबीर बनवून खा. याशिवाय मेथीची पानं चांगली धुवून त्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आणि दिवसा याचे पाणी प्या.
डिस्क्लेमर - हा लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.