Hair Care Tips: ट्रीटमेंटनंतर केसांना लगेचच तेल लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सविस्तर

Hair treatment: हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर केसांना तेल लावावे की लावू नये? जाणून घ्या सविस्तर ...
Hair Care Tips
Hair Care Tips Sakal
Updated on

Hair Care Tips : हेअरवॉश केल्यानंतर काही जणांना केसांना तेल लावण्याची शक्यता असते.  आपली आई आणि आजी देखील केसांना तेल लावण्याचा सल्ला वारंवार देत असतात. तेलाने केसांचा मसाज केल्यास केसांचे पोत व आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

तेलामुळे कोंडा, कोरड्या केसांची समस्या कमी होऊ शकते. पण खरंच हेअरवॉश केल्यानंतर केसांना तेल लावणे योग्य आहे की अयोग्य?  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नॅचरल कंडिशनर

तेल लावल्याने केसांचे क्युटिकल्स बंद होण्यास मदत मिळते. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच केस मऊ तसेच सुंदर देखील होतात. 

केसांवरील चमक वाढते

योग्य तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केसांवरील चमक वाढण्यास मदत मिळते. तसेच केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा देखील होता. 

Hair Care Tips
Hair Care Tips : केसगळती रोखण्यासाठी या पानांचा वापरा हेअरमास्क, केस होतील लांबसडक

कोरड्या केसांची समस्या कमी होते

कोरड्या केसांच्या समस्येतून सुटका हवी असल्यास हेअर केअर रूटीनमध्ये तेलाचा समावेश करावा. यामुळे केस मऊ व चमकदार होण्यास मदत मिळते. 

Hair Care Tips
Celebrity Hair Care Tips : अभिनेत्री भाग्यश्री केसांसाठी या 2 तेलांचा करते वापर, जाणून घ्या तेलाचं नाव-फायदे

या गोष्टीही ठेवा लक्षात

चिकट तेल वापरू नये

जास्त प्रमाणात तेल लावल्यास केस चिकट होण्याची शक्यता असते आणि जर आपण हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर केसांना तेल लावल्यास यामुळे केसांचे नुकसानच होऊ शकते. 

Hair Care Tips
Hair Care Tips केसांना तेल कधी व कसे लावावे? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अगणित फायदे

ट्रीटमेंटनंतरचे फायदे मिळत नाहीत

हेअर केअर ट्रीटमेंट केल्यानंतर लगेचच तेल लावल्यास त्यापासून मिळणारे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे पैसाही वाया जाणार आणि केसांचे नुकसान होईल ती वेगळीच समस्या. 

केसांवर होते धूळ जमा 

हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर लगेचच तेल लावल्यास आणि घरातून बाहेर पडल्यास वातावरणातील धूळ-माती केसांवर जमा होते. परिणामी टाळूच्या त्वचेवर आणि केसांमध्ये घाण जमा होते.   

केसांना तेल कधी आणि कसे लावावे?

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. जाणून घेऊया अधिक माहिती…

केसांचा प्रकार महत्त्वाचा 

जर तुमचे केस नैसर्गिकरित्याच कोरडे असतील तर हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर लगेचच नव्हे पण काही दिवसांनी केसांचा ऑइल मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केसांना मोठे लाभ मिळतात.  

चिकट तेल वापरणे टाळा

आर्गन ऑइल किंवा जोजोबा ऑइल यासारख्या हलक्या तेलाची निवड करावी. चिकट तेलाची निवड केल्यास केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. 

तेल लावण्याची वेळ देखील महत्त्वाची 

  • हेअर ट्रीटमेंट करण्याच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी तेलाने केसांचा मसाज करावा. 

  • केस धुण्यापूर्वी आदल्या रात्री किंवा अर्धा तास आधी तेल लावावे.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.