​Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे करा दह्याचे सेवन... काही दिवसात दिसेल फरक

Curd For Weight Loss : तुम्हाला माहित आहे का? दही, बीटरूट आणि मखाना मिसळून खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
Curd For Weight Loss
Curd For Weight Losssakal
Updated on

अनेकजण वजन कमी करण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एका अशा खाद्यपदार्थाविषयी सांगणार आहोत, जे तुमचे वजन कमी करण्यात मदत करू शकतात. तुम्हाला माहित आहे का? दही, बीटरूट आणि मखाना मिसळून खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.

बीटरूट दही मखाना कसा बनवायचा

लागणारे साहित्य

  • बीटरूट - 1 वाटी किसलेले

  • दही- 1 वाटी

  • मखाना - 1 कप

बनवण्याची पद्धत

एक मोठी वाटी घ्या आणि त्यात एक लहान वाटी दही टाका.

किसलेले बीटरूट आणि मखाना एकत्र करा.

आता त्यात थोडे पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात जिरे आणि हिंग टाकू शकता.

बीटरूट दही मखाना तयार आहे

Curd For Weight Loss
Monsoon Health Care : तुम्हाला माहीत आहे का पावसाळ्यात रोज 1 चमचा मध खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या

बीटरूट दही मखाना वजन कमी करण्यासाठी कसा उपयुक्त आहे?

आम्ही तुम्हाला सांगतो की मखानामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते जे वजन कमी करण्याच्या प्रवासात चमत्कार करू शकतात. यामध्ये असलेले प्रोटीन तुमची क्रेविंग कमी करण्यास मदत करते. फायबरमुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यात असलेल्या बीटरूटबद्दल बोलायचे झाले तर, ही खूप कमी कॅलरी असलेली भाजी आहे.

त्याच वेळी, दही पाचन तंत्र निरोगी ठेवते, ज्यामुळे चयापचय वाढतो आणि जेव्हा चयापचय निरोगी राहते तेव्हा ते फॅट बर्न करण्यास मदत करते. यामुळे कॅलरी कमी होते. दह्याच्या एका वाटीत साधारण ६०-८० कॅलरी असते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी दही खाणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळी अथवा दुपारी दही खाण्याची योग्य वेळ आहे. रात्री दही खाल्ल्यास सर्दी वा खोकला होऊ शकतो. दही दुपारी खाल्ल्याने अन्न पचवणे अधिक सोपे होते आणि त्यामुळे वजन वाढत नाही. अशाप्रकारे बीटरूट दही मखाना तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()