Benefit Of Ice Apple : आता बिंधास्त प्या ताडी कारण, आहेत आश्चर्यचकीत करणारे फायदे!

खूप जण आरोग्याला चांगली म्हणून ताडीचे सेवन करतात
Benefit Of Ice Apple
Benefit Of Ice Appleesakal
Updated on

Benefit Of Ice Apple :  उन्हाळ्यात अगदी कोपऱ्या कोपऱ्यारवर ताडीचे स्टॉल दिसू लागतात. खूप जणांना ताडी किंवा नीरा म्हटली, ती दारूच आहे असे वाटते. पण असे मुळीच नाही बरं का! ताडी आणि नीरा पिण्याची योग्य वेळ असते. त्यावेळी ती प्यायली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.

ताडी ही नारळाच्या झाडांच्या फुलांपासून बनवली जाते. या शिवाय खजुराच्या झाडाच्या फुलांपासून ही  बनवली जाते. याची चव गोड असते. शिवाय यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. खूप जण आरोग्याला चांगली म्हणून ताडीचे सेवन करतात. यात फायबर आणि अनेक पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे कार्य करू शकतात. याशिवाय पाम फ्रूट म्हणजेच ताडगोळा फळाचे फायदे अनेक आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Benefit Of Ice Apple
Coconut Paneer Recipe : घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ही झटपट बनणारी खास डिश, पाहुणेही म्हणतील वाह..

पोटाला थंडावा देते

पोट थंड करण्यासाठी ताडगोळ्याचे फायदे अनेक आहेत. त्याचा स्वभाव थंड आहे, जो पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पचनसंस्था वाढविण्यास उपयुक्त आहे. याशिवाय अम्लीय पित्ताचा रस कमी करण्यास आणि अॅसिडिटीपासून मुक्त होण्यास उपयुक्त आहे. याशिवाय मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आइस सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते.

फायबर युक्त ताडी

फायबरयुक्त ताडगोळा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे फायबर चयापचय वेगवान करते आणि पचन सुधारण्यास उपयुक्त आहे. इतकंच नाही तर यामुळे आतड्यांसंबंधी हालचालही वेगवान होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. अशा प्रकारे पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठीही हे फायदेशीर आहे.

Benefit Of Ice Apple
Coconut Remedies : 40 रुपयांच्या नारळानं बदलणार तुमचं नशीब, पैशांचा पडणार पाऊस

यूटीआयमध्ये फायदेशीर

यूटीआयमध्ये ताडगोळ्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे केवळ लघवीचे प्रमाण वाढवणारे नाही तर बॅक्टेरियातील संक्रमण कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने तुमच्या मूत्राशयाचे आरोग्य योग्य राहते आणि लघवीशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे या सर्व कारणांसाठी ताडगोळ्याचे सेवन करावे.

 वजन वाढवण्यावर फायदेशीर

ज्यांची शरीर प्रवृत्ती अगदीच कृश आहे. अशांसाठीही ताडी उत्तम आहे. कारण यामध्ये असलेली साखर वजन वाढवण्यास मदत करते. ज्यांना वजन वाढवण्यासाठी गरज आहे. अशांना याचे सेवन करावे. फायदा होईल. ज्यांना रक्ताची कमतरता आहे. अशांनी तर अगदी आवर्जून ताडी प्यायला हवी. कारण त्याच्या सेवनामुळे रक्त वाढण्यास मदत मिळते.

कधी सेवन करावे

ताडी ही योग्य वेळी पिणे गरजेचे असते. सकाळी ताजी ताजी आलेली ताडी /नीरा प्याल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. त्याची चव गोड लागते. पण जशी उन्ह चढू लागता. तसे त्याचे रुपांतर हे एखाद्या दारुच्या चवीमध्ये होते. यामध्ये अल्कोहलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही चढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()