Benefits of breast feeding : स्तनपानाचं महत्व आणि फायदे

प्रसुतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे जन्मानंतर बाळाला लगेच स्तनपान द्यावे
 breast feeding
breast feedingesakal
Updated on

Breast feeding: 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याकाळात प्रयत्न केले जातात.बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध अतिशय महत्वाचं असतं आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात.अनेक प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतात. स्तनपान म्हणजे आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसुतीनंतर चा एक नैसर्गिक टप्पा.स्तनपानाचे आई व बाळासाठी अनेक फायदे, माहिती असून सुद्धा नीट स्तनपान करू शकत नाही त्यांना अनेक अडचणी येतात. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आईच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतात. प्रसुतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे जन्मानंतर बाळाला लगेच स्तनपान द्यावे. किमान पहिले एका तासात नक्की द्यावे.

प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तना मधूनच चिक येतो हा चीक बाळासाठी अमूल्य असतो. चिकामध्ये ए आणि के हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात. त्यांमध्ये प्रतिबंधक द्रव्य व इतर आवश्यक घटक असल्यामुळे जन्तुसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते. यामध्ये प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाच्या वाढीला फायदा होतो. स्तनपानाचे अनेक फायदे माता व बालक दोघांनाही मिळतात. 

 breast feeding
Baby Care Tips: लहान बाळाची नखं कापताना लक्षात या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा

आईचे दुध बाळासाठी अमृतच आहे. मातेच्या दुधामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके व बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा योग्य मिलाफ असतो. ह्यामुळे बाळाची नीट वाढ होते.मातेच्या दुधातील प्रतिबंधक द्रव्यांमुळे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राहते. जंतुसंसर्ग अथवा एलर्जी पासून बाळाला संरक्षण मिळते.आईचे दूध निर्जंतुक असल्याने बाळाला जंतुसंसर्ग होत नाही.स्तनपानामुळे आई व बाळा मधील नाते अधिक दृढ होते.बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. स्तनपानामुळे बाळाचे स्नायू नीट तयार होतात. 

 breast feeding
Adhik Maas 2023 : जावई, गायीला वाण, मातेचे पूजन अन् 33 मेहूण भोजन; जाणून घ्या अधिक मासातील दानाचे महत्त्व!

स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते.स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे शक्य होते.स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाचा मधील बदलामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.सर्वसाधारणपणे मातेने बाळाला भुकेप्रमाणे दूध पाजावे.ठराविक वेळा ठरवून दूध पाजण्याची गरज नाही. बाळाची वाढ होत असताना ते गरजेप्रमाणे दुध पिते. 

 breast feeding
Adhik Maas 2022: अधिक मासात महिला जोडवी का बदलतात?

मात्र तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे.काही विशिष्ट वेळेला मात्र दर दोन तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. उदाहरणार्थ अपुर्या दिवसांचे बाळ अडीच किलोपेक्षा कमी अथवा साडेतीन पेक्षा जास्त वजनाची बाळे तसेच गर्भावस्थेमध्ये मधुमेह झालेल्या स्त्रियांची बाळे. स्तनपान नंतर बाळ किमान दोन तास शांत झोपत असेल दिवसातून सहा ते आठ वेळा सु-शी करत असेल व बाळाचे वजन योग्यरीत्या वाढत असेल तर याचा अर्थ बाळाला पुरेसे दूध मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.