Fish For Mental Health : मानसिक आरोग्यासाठी लाभदायी आहेत मासे, जाणून घ्या फायदे

मासे खाणे हे शरीरासोबतच मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Fish For Mental Health
Fish For Mental Healthesakal
Updated on

Fish For Mental Health : निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचे योग्य संतुलन राखले की आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषकघटकांमध्ये प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे महत्वाची भूमिका बजावतात.

मासे हे शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करणारे अन्न आहे. माशांमध्ये प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B2, कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक, लोह इत्यादींचे भरपूर प्रमाण आढळून येते. मासे खाल्ल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की, मासे खाल्ल्यामुळे आपले मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

नैराश्याचा धोका होतो कमी

माशांमध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडमुळे नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. शिवाय, ओमेगा फॅटी अ‍ॅसिडचा वापर अनेक प्रकारच्या अँटी-डिप्रेसंटमध्ये आवर्जून केला जातो, यामुळे, मेंदूला अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत होते.

Fish For Mental Health
Mental Health: मानसिक आरोग्य बिघडल्यावर 'ही' लक्षणं दिसतात; तुम्हालाही जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा

मेंदूसाठी फायदेशीर

माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आढळते. हे अ‍ॅसिड गर्भधारणेच्या दरम्यान मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच, यामुळे, बाळाची दृष्टी आणि न्यूरॉन्सच्या विकासामध्ये मदत होते. यामुळे, अल्झायमर रोग, स्मृतीभ्रंश, नैराश्य आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून एकदा माशांचा आहारात समावेश करतात. त्यांचे मेंदूचे कार्य हे सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच, स्मरणशक्ती ही नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदयासाठी लाभदायी

माशांमध्ये आढळून येणाऱ्या ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच, स्ट्रोक्सची समस्या, हृदयविकाराचा धोका कमी होण्यास ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड मदत करते.

त्यामुळे, ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या किंवा हृदयविकाराची समस्या आहे, अशा लोकांनी आहारात जरूर माशांचा समावेश करावा. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड सर्व प्रकारच्या माशांमध्ये आढळून येते.

मात्र, चरबीयुक्त माशांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून येते. सॅल्मन, ट्राऊट, सार्डिन, हेरिंग, मॅकरेल, ट्यूना इत्यादी प्रकारचे मासे हे खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Fish For Mental Health
Bad Eating Habit : पटपट जेवण करताय?मग, वेळीच सावध व्हा! अन्यथा ‘या’ आजारांना बळी पडाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.