ध्यानाचे फायदे

एखादी अस्वस्थ करणारी घटना घडते त्यावेळी मनात भावनेचं प्राबल्य वाढल्याचं आपल्याला जाणवेल.
meditation
meditationsakal
Updated on

ध्यान साधण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यातच ध्यानाचे फायदेही दडलेले आहेत.

Respond Instead of React - एखादी अस्वस्थ करणारी घटना घडते त्यावेळी मनात भावनेचं प्राबल्य वाढल्याचं आपल्याला जाणवेल. त्यावेळी आपण सारासारबुद्धी वापरून respond न करता भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन react करतो, असं आपल्याला लक्षात येईल. माझ्याच बाबतीत असं का घडलं? पुढे काय घडेल? त्याला कसं तोंड द्यायचं? इत्यादी इत्यादी. सततच्या अशा भावनेच्या भरात येणारे विचार आपल्याला आणखी अस्वस्थ करत नेतात. शांत, स्वच्छ आणि उपयुक्त विचार आपल्याला करता येत नाही. मेडिटेशनमुळे मन शांत झालं असेल, तर विवेकाधिष्ठित, बेस्ट possible अशी योग्य कृती आपण करू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.