Benefits of Pulses : आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ‘या’ डाळींमध्ये लपलाय प्रथिनांचा खजिना, आजच करा आहारात समावेश

Benefits of Pulses : भारतीय जेवणात प्रामुख्याने डाळींचा समावेश केला जातो. बरेच लोक दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात डाळींचे सेवन करतात.
Benefits of Pulses
Benefits of Pulsesesakal
Updated on

Benefits of Pulses : भारतीय जेवणात प्रामुख्याने डाळींचा समावेश केला जातो. बरेच लोक दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात डाळींचे सेवन करतात. डाळींमध्ये मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ इत्यादी अनेक प्रकारच्या डाळींचा समावेश होतो. या डाळींमध्ये प्रथिनांचे विपुल प्रमाण आढळून येते. या डाळींचा आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत असलेल्या डाळी शाकाहारी लोकांसाठी वरदान आहे, कारण, त्यांना या डाळींमधून भरपूर प्रथिने मिळतात. प्रथिनांसह डाळींमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. डाळींचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू, हाडे आणि त्वचेचे आरोग्य ही चांगले राहते. कोणत्या आहेत त्या डाळी ज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

Benefits of Pulses
Benefits of finger Millet : उन्हाळ्यात नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी, जाणून घ्या फायदे

मसूर डाळ

मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे विपुल प्रमाण आढळते. मसूरच्या डाळीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. अशक्तपणा दूर करण्यासाठी शारिरीक तंदूरूस्तीसाठी मसूर डाळ अतिशय उत्तम मानली जाते.

उडीद डाळ

इडली-सांबारमध्ये उडीद डाळीचा प्रामुख्याने वापर केला जातो. भातासोबत उडीद डाळ खायला अनेकांना आवडते. उडीद डाळीपासून आमटी बनवली जाते, सार केले जाते. उडदाच्या डाळीमध्ये प्रथिनांसोबतच, जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. उच्च प्रथिनांचा स्त्रोत म्हणून या डाळीकडे पाहिले जाते.

मूग डाळ

मूग डाळ देखील प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. ही डाळ खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक प्रथिने मिळू शकतात. मूग डाळीची भाजी, आमटी बनवली जाते आणि खास करून खिचडी बनवली जाते. आजारी व्यक्तीला किंवा ज्यांना अशक्तपणा आला आहे, अशा लोकांना आहारात मूग डाळीचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

तूर डाळ

तूर डाळीमध्ये प्रथिनांसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते, त्यामुळे, ही डाळ आरोग्यासाठी लाभदायी मानली जाते. या डाळीचे सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. अनेकांना तूर डाळीचे वरण आणि भात खायला आवडते. या डाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषकघटकांचे अधिक प्रमाण आढळते. ही डाळ अनेक प्रकारच्या आजारांपासून आपल्या शरीराचा बचाव करते.

Benefits of Pulses
Health Care : अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने मृत्यूचा धोका लवकर वाढतो; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.