Benefits of Virabhadrasana : शारिरीक तंदूरूस्तीसाठी प्रभावी असणाऱ्या वीरभद्रासनाचे प्रकार किती? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Benefits of Virabhadrasana : योगाभ्यासाची सवय शरीराच्या एकूण ताकदीला चालना देण्याबरोबरच संतुलन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
Benefits of Virabhadrasana
Benefits of Virabhadrasanaesakal
Updated on

Benefits of Virabhadrasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की आरोग्य निरोगी राहते. योगाभ्यासाची सवय शरीराच्या एकूण ताकदीला चालना देण्याबरोबरच संतुलन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो.

या योगासनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे वीरभद्रासन होय. या योगासनाचा नियमित सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य तंदूरूस्त राहण्यास मदत होते. वीरभद्रासनाचा सराव करायला जरा कठीण असल्यामुळे हा योगा जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर योगा तज्ज्ञाची मदत घ्या. आज आम्ही तुम्हाला वीरभद्रासनाचे प्रकार कोणते? आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

Benefits of Virabhadrasana
Benefits Of Uttanasana : झोपेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर उत्तानासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

वीरभद्रासनाचे प्रकार कोणते?

वीरभद्रासनामध्ये ५ प्रकारच्या आसनांचा समावेश असतो. त्या ५ प्रकारच्या आसनांबद्दल जाणून घेऊयात.

पहिले वीरभद्रासन

वीरभद्रासनामध्ये तुमच्या पायाच्या घोट्याला वाकवून नितंब वरच्या दिशेने उचलावे लागते. हा झाला वीरभद्रासनाचा पहिला प्रकार.

दुसरे वीरभद्रासन

या वीरभद्रासनामध्ये समोरचा घोटा किंवा गुडघा वाकवावा लागतो आणि नितंब बाजूला वळवताना तुमचे दोन्ही हात समांतर ठेवावे लागतात.

तिसरे वीरभद्रासन

या योगासनामध्ये एका पायावर संतुलन साधताना सरळ रेषेत उभे राहून तुमचे दोन्ही हात पुढे ठेवा आणि दुसरा पाय वरच्या बाजूला करा.

बद्ध वीरभद्रासन :

या प्रकारच्या आसनात वीरभद्रासन २ प्रकाराप्रमाणे पायांची हालचाल करताना तुमचे शरीर पुढे वाकले पाहिजे आणि हात मागे असायला हवेत.

विपरित वीरभद्रासन

या विपरित आसनात तुमच्या पायांची स्थिती वीरभद्रासन २ प्रमाणे असते आणि तुमचे दोन्ही हात आणि शरीराची स्थिती सरळ पायांच्या दिशेने बाजूला करा.

वीरभद्रासनाचे आरोग्याला होणारे फायदे :

  • वीरभद्रासन या योगासनाचा नियमित सराव केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • शरीरातील स्नायूंना बळकट करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.

  • खांदे, हात, पाय घोटे आणि पाठ मजबूत करण्यासाठी वीरभद्रासन हे योगासन लाभदायी आहे.

  • वीरभद्रासन या योगासनाचा नियमित सराव केल्याने शरीराचे संतुलन, स्थिरता आणि मनाची एकाग्रता सुधारते.

  • शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी हे योगासन अतिशय प्रभावी आहे.

Benefits of Virabhadrasana
Benefits Of Mandukasana : मधुमेहींसाठी रामबाण आहे मंडूकासन, दररोज केल्याने मिळतील भरपूर फायदे, जाणून घ्या सरावाची पद्धत

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.