Benefits Of Vrikshasana : मानसिक अन् शारिरीक संतुलन राखण्यासाठी वृक्षासन उपयुक्त, जाणून घ्या सरावाची पद्धत आणि फायदे

Benefits Of Vrikshasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे अतिशय फायदेशीर मानले जाते.
Benefits Of  Vrikshasana
Benefits Of Vrikshasanaesakal

Benefits Of Vrikshasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही नियमित योगा आणि संतुलित आहार घेतला तर तुमचे आरोग्य निरोगी राहू शकेल. यात काही शंका नाही. दररोज योगासनांचा सराव केल्याने तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य तंदूरूस्त राहण्यास मदत होते.

या योगासनांमध्ये विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो. जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करण्यास सुरूवात करणार असाल तर, तुम्ही काही सोप्या योगासनांपासून याची सुरूवात करू शकता. या सोप्या योगासनांमध्ये वृक्षासनाचा समावेश आहे.

नियमित वृक्षासनाचा सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे योगासन करू शकतात. आज आपण वृक्षासन करण्याची पद्धत कोणती? आणि या योगासनाचे फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

Benefits Of  Vrikshasana
Benefits Of Uttanasana : झोपेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर उत्तानासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

वृक्षासन करण्याची योग्य पद्धत कोणती?

  • वृक्षासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा.

  • आता तुमच्या उजव्या पायाचा गुडघा वाकवून तो डाव्या पायावर ठेवा.

  • या स्थितीमध्ये तुमचा डाव पाय सरळ रेषेत ठेवा आणि तुमचे शरीर संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमचे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करा आणि नमस्काराच्या मुद्रेत सरळ रेषेत ठेवा.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

वृक्षासनाचे आरोग्यदायी फायदे कोणते?

  • आपले शारिरीक आणि मानसिक संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे.

  • या योगासनामुळे एकाग्रता सुधारते, पाय-घोटे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात.

  • नियमित हे योगासन केल्याने सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

  • पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे. त्यासाठी या योगासनाचा दररोज सराव करा.

  • आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्याचे काम वृक्षासन करते. त्यामुळे, या योगासनाचा दररोज सराव करा.

  • मनाची एकाग्रता, स्थिरता कायम ठेवण्यासाठी आणि ताण-तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी वृक्षासनाचा दररोज सराव करा.

  • लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे योगासन फायदेशीर आहे. फक्त याचा दररोज सराव अवश्य करा.

Benefits Of  Vrikshasana
Aqua Yoga Benefits : वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे अ‍ॅक्वा योगा, जाणून घ्या फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com