Zumba For Fitness : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. आजकाल अनेक जण तंदूरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट, व्यायाम, योगा आणि झुम्बाची मदत घेतात. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी झुम्बा डान्स फायदेशीर आहे. झुम्बा डान्सच्या माध्यमातून वर्कआऊट करण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
झुम्बा डान्स नियमित केल्याने उत्तम फिटनेस राखण्यात मदत होते. या वर्कआऊटद्वारे तुम्ही तुमचे शरीर लवचिक बनवू शकता तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. जिममध्ये केल्या जाणाऱ्या वर्कआऊटच्या तुलनेत झुम्बा डान्स अतिशय फायदेशीर मानला जातो. झुम्बा डान्समध्ये सालसा, हिपहॉप आणि बेली डान्स इत्यादी अनेक प्रकारच्या नृत्यशैलींच्या स्टेप्सचा समावेश असतो. आज आपण झुम्बा केल्याने आरोग्याला होणारे फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.
नियमितपणे झुम्बा डान्स केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. रोज झुम्बा डान्स केल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते. हा एक प्रकारचा आनंदी संप्रेरक आहे, जो आपला मूड नियंत्रित ठेवण्याचे काम करते. झुम्बा केल्याने हा आनंदी संप्रेरक बाहेर पडतो ज्यामुळे, मूड सुधारतो आणि ताण-तणाव, नैराश्य दूर होते.
दररोज झुम्बा डान्सचा सराव केल्याने आपल्या शरीराची हालचाल चांगली होते. ज्यामुळे, शरीरातील स्नायूंमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगली होते. यामुळे, आपले शरीर मजबूत होण्यास मदत होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. झुम्बा केल्याने शरीर सक्रिय राहते आणि हातपायांचे स्नायू मजबूत होतात.
नियमितपणे झुम्बा डान्सचा सराव केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसेच, झुम्बा डान्स करताना आपले शरीर सक्रिय होते. त्यामुळे, शरीरातील अतिरिक्त चरबी वितळू लागते. वजन कमी करण्यासाठी झुम्बा फायदेशीर असला तरी याचा नियमित सराव करणे गरजेचे आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.