'आई' हा शब्द ऐकायला जितका सुंदर वाटतो तितकाच त्याचा प्रवास हा कोणत्याही स्त्री साठी कठीणच असतो. परंतु हा प्रेग्नन्सीचा काळ अधिक सुखकर आणि वेदनाविरहित व आनंदित करण्यासाठी त्या स्त्रीला आरामासोबतच व्यायामाची देखील तितकीच गरज असते. गरोदर अवस्थेत शारीरिक स्वास्थ्य आणि आरोग्य सांभाळणं अतिशय गरजेचं असतं.
गरोदरपणात शरीरात हार्मोनल बदल होत असतात, त्यामुळे पाय सुजतात आणि वजन वाढू लागते. अशा परिस्थितीत प्रत्येक स्त्रीने गरोदरपणात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे गर्भवती महिला तर तंदुरुस्त राहतेच पण गर्भातील मूलही निरोगी राहते. यासाठी गरोदर महिलांनी दररोज काही सोपे व्यायाम करावेत. हे सोपे व्यायाम गर्भवती महिलांचे शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
व्हॉट टू एक्सपेक्ट नुसार, हे आवश्यक नाही की रनिंग केवळ फास्टच केली पाहिजे, गर्भधारणेदरम्यान तुम्ही ते अगदी आरामात देखील करू शकता. गरोदरपणात चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मशीनची गरज भासत नाही. हे तुमच्यासाठी फायदेशीर आणि सुरक्षित आहे. गर्भवती महिलेने दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. गरोदरपणात चालणे हा तुमच्यासाठी एक चांगला व्यायाम आहे, तो तुम्ही आणि तुमचे बाळ दोघांनाही तंदुरुस्त ठेवतो.
गरोदरपणात स्वीमिंग आणि वॉटर एरोबिक्स हे एक परफेक्ट वर्कआउट आहे. कारण मळमळ, चक्कर येणे, पाय सुजणे अशा सर्व समस्या स्विमिंग पूलमध्ये गेल्याने कमी होतात. लाइट झुम्बा तुमच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय उडी मारणे टाळा.