Health Care News : चिया सीड्समध्ये दडलाय आरोग्याचा खजिना; या प्रकारे आपल्या आहारात करा समावेश

एवढेच नाही तर केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासही ते मदत करतात. आपण आपल्या आहारात याचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Health Care News
Health Care Newssakal
Updated on

आजकाल जवळपास सर्वचजण आरोग्याची काळजी घेताना दिसतात. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे फळे, बीया आणि इतर पौष्टीक पदार्थ खात असतात.

डॉक्टरआपल्याला चिया सीड्स खाण्याचा सल्ला देतात. या सीड्स खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात. एवढेच नाही तर केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासही ते मदत करतात. आपण आपल्या आहारात याचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

स्मूदी

तुम्ही स्मूदी बनवू शकता. यासाठी तुमच्या आवडीची फळे, एक चमचा चिया सीड्स आणि दूध या सर्व गोष्टी ब्लेंडरमध्ये टाकून ब्लेंड करा. नंतर बर्फ टाकून प्या.

दही किंवा लस्सी

एका वाटीत दही घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा चिया सीड्स मिसळा आणि 20 मिनिटे थंड ठिकाणी ठेवा. तुम्ही ते लस्सीमध्ये मिसळूनही पिऊ शकता.

Health Care News
Health Care News : 'थायरॉईड' नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे समावेश!

चिया पुडिंग

रात्री ग्लास किंवा कपमध्ये दूध किंवा दही घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे चिया सीड्स घाला. सकाळी तुमचा हेल्दी नाश्ता तयार आहे.

शिकंजी

तुम्हाला शरीर थंड ठेवण्यासाठी शिकंजी प्यायला आवडत असेल तर एका ग्लासमध्ये एक चमचा चिया सीड्स घेऊन त्यात पाणी भरा. आता लिंबाचा रस, काळे मीठ, थोडी साखर एकत्र करून प्या. त्यात तुम्ही पुदिनाही टाकू शकता.

जळजळ कमी होणे

चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांमुळे जळजळ कमी होते. तसेच संधिवात, फायब्रोमायल्जिया आणि इतर संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य

चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा -3 आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तदाब आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो.

Related Stories

No stories found.