Yoga Tips : जगभरात मागील काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अगदी तरूणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हृदयविकाराचा झटका येताना दिसून येतोय. हा धोका वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. सध्याची बिघडलेली जीवनशैली, अपुरा आहार, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो.
या धोक्यापासून दूर रहायचे असेल तर तुम्ही आहाराची आणि फिटनेसची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. योगामध्ये अनेक प्रकारच्या आसनांचा समावेश आढळतो. ही आसने नियमित केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका टळतो. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
वृक्षासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी लाभदायी असणारे हे योगासन करायला ही अतिशय सोपे आहे.
दररोज या योगासनाचा सराव केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच, मन शांत ठेवण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे. या आसनाचा नियमित सराव केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच पोटावरील आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी देखील वीरभद्रासनाचा दररोज सराव करावा.
मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती हे योगासन करू शकतात. अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी हे योगासन लाभदायी ठरते.
शरीराचे योग्य संतुलन राखण्यासाठी आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही या योगासनाचा दररोज सराव करू शकता. या योगासनामुळे हृदयाची गती नियंत्रित राहते. तसेच, हृदयाची क्षमता सुधारण्यासाठी आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात या योगासनाचा जरूर समावेश करा. महत्वाचे म्हणजे या योगासनाचा दररोज सराव केल्याने शरीरातील रक्तपरिसंचारण सुधारते आणि तणाव कमी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.