Yoga For stress : फार स्ट्रेस आहे? स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी करा हा योगा, जाणून घ्या योग्य पद्धत

ऑफिसमध्ये बसले असाल किंवा घरी बसले असाल तरीसुद्धा तुम्ही हा योगा करू शकता. चला तर या योगाचे फायदे जाणून घेऊया
Yoga For stress
Yoga For stress esakak
Updated on

Yoga For stress : योगाच्या मदतीने अनेक आजांतून आपल्याला मुक्ती मिळू शकते. त्याचा नियमित सराव केल्यास तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. कपालभारती आणि अनुलोम विलोमप्रमाणे भ्रामरी प्राणायम असते. हा श्वासोच्छवासाचा सराव आहे. भ्रामरी प्राणायमच्या नियमित सरावाचे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. हा योगा तुम्ही ऑफिसमध्ये बसले असाल किंवा घरी बसले असाल तरीसुद्धा तुम्ही हा योगा करू शकता. चला तर या योगाचे फायदे जाणून घेऊया.

भ्रामरी प्राणायमचा मेंदूवर प्रभाव पडतो

भ्रामरी प्राणायम हा श्वासोच्छवासा सराव असून हा योगा केल्याने फ्रस्ट्रेशन, एंझायटी आणि राग दूर करण्यास मदत होते. या योगासनाने मेंदू आणि कपाळच्या मध्यातील नर्व्ह्ज शांत होण्यास मदत मिळते.

Yoga For stress
Relationship Stress झटक्यात दूर करेल या सोप्या ट्रिक्स

भ्रामरी प्राणायम करण्याचे फायदे

भ्रामरी प्राणायम केल्याने राग, चिंता आणि एंझायटीपासून आराम मिळतो.

जे लोक हायपरटेंशनने त्रस्त आहेत त्यांच्या मेंदूला हा प्राणायमच्या सरावाने आराम मिळतो.

मायग्रेनच्या त्रासातूनही तुम्हाला आराम मिळेल.

तुम्हाला तणावामुळे डोकेदुखीचा त्रास असेल तर हा योगा आवर्जून करा.

हाय ब्लड प्रेशर भ्रामरी प्राणायमच्या मदतीने कमी केल्या जाऊ शकते.

मेडिटेशन करण्यास अडथळे येत असतील तर सगळ्यात आधी भ्रामरी प्राणायम करा. (Yoga)

Yoga For stress
Stress Management : तणावात नव्‍हे आत्‍मविश्‍वासाने करा परीक्षांची तयारी! तज्‍ज्ञांकडून विद्यार्थी पालकांना सल्‍ला

भ्रामरी प्राणायम करण्याची योग्य पद्धत

कुठल्याही शांत, हवेशीर वातावरणात बसा.

आता डोळे बंद करा.

दोन्ही हातांना हातांचे पहिले बोट आणि कान व गालाच्या मध्ये म्हणजेच कार्टिलेजवर ठेवा.

आता बोटांनी हलके दाबून तोंडातून मधमाशीसारखा आवाज काढा.

हा आवाज बंद तोंडातून निघेल.

१०-२० सेकंद आवाज काढल्यानंतर शांत व्हा आणि सामान्य अवस्थेत परत या.

भ्रामरी प्राणायम करताना या गोष्टींची काळजी घ्या

हे प्राणायम करताना बोटांना कानाच्या आत टाकू नका. (Stress)

कार्टिलेज फार जोरात दाबण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे तुम्हाला पेन होऊ शकतं.

आवाज काढताना तोंड बंद ठेवा.

चेहऱ्यावर प्रेशर टाकू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.